Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK पुन्हा महामुकाबला? ‘हे’ समीकरण येत आहेत जुळून

आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. आता पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये सामना होणार का? सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला कोणती समीकरणे जुळवावी लागतील, वाचा सविस्तर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 15, 2025 | 06:17 PM
IND vs PAK (Photo Credit- X)

IND vs PAK (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK पुन्हा महामुकाबला?
  • ‘हे’ समीकरण येत आहेत जुळून
  • यूएई आणि ओमानचा सामना ठरणार महत्त्वाचा

IND vs PAK: आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या एकतर्फी सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलमान अली आगाच्या संघाला जोरदार धूळ चारली. या विजयामुळे भारताने 4 गुण मिळवून सुपर 4 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे, तर पाकिस्तानचा संघ 2 गुणांवर अडकून पडला आहे. यामुळे, आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे: याच आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचा सामना होणार का?

भारताकडे 4, पाकिस्तानकडे 2 गुण

भारत आणि पाकिस्तानला आशिया कपच्या ‘ग्रुप ए’ मध्ये ठेवण्यात आले आहे. भारताने आपले दोन्ही सामने जिंकून सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, पाकिस्तानचे सुपर 4 मधील स्थान अद्याप निश्चित नाही. त्यांना पुढील फेरी गाठण्यासाठी काही समीकरणे जुळवावी लागतील. या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला, तर पाकिस्तानने ओमानला हरवले होते.

यूएई आणि ओमानचा सामना ठरणार महत्त्वाचा

आगामी काळात यूएई आणि ओमान यांच्यात एक महत्त्वाचा सामना होणार आहे. जर या सामन्यात यूएईने ओमानला हरवले, तर त्यांचेही 2 गुण होतील. त्यानंतर पाकिस्तानचा सामना यूएईसोबत होईल. जर या सामन्यातही यूएईने विजय मिळवला, तर त्यांचे ४ गुण होतील आणि पाकिस्तान 2 गुणांवरच राहील. अशा परिस्थितीत भारत आणि यूएई हे दोन्ही संघ सुपर ४ मध्ये जातील, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल.

IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम

21 सप्टेंबरला पुन्हा ‘महामुकाबला’?

आशिया कपच्या लीग फेरीनंतर, सुपर 4 चे सामने सुरू होतील. 21 सप्टेंबर रोजी ‘ग्रुप ए’ मधील पहिल्या दोन संघांमध्ये लढत होईल. म्हणजेच, भारतीय संघ या दिवशी पुन्हा एकदा मैदानात उतरेल. भारताचा पुढील सामना ओमानसोबत होणार आहे आणि त्यात विजय मिळवून भारत 6 गुणांसह ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, 21 सप्टेंबर रोजी भारताचा सामना यूएई किंवा पाकिस्तान यापैकी कोणाशी होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर, भारतीय संघाने त्यांच्यासोबत हात मिळवण्यासही नकार दिला होता. यामुळे दोन्ही संघांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे जर 21 सप्टेंबर रोजी पुन्हा भारत-पाकिस्तानचा सामना झाला, तर तो आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ind vs pak again asia cup 2025 scenarios

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • india
  • pakistan
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs PAK : “सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर…”, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘आप’ने दिले मोठे आव्हान
1

IND vs PAK : “सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर…”, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘आप’ने दिले मोठे आव्हान

OMAN vs UAE : ओमान संघाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; यूएई घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात 
2

OMAN vs UAE : ओमान संघाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; यूएई घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात 

IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम
3

IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम

भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन! आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
4

भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन! आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.