दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
आशिया कप २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी राहिलेला वेगवान गोलंदाज हरीस रौफचे एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. निवडकर्त्यांकडून त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. तरुण खेळाडू फैसल अक्रम आणि हसीबुल्लाह यांना देखील संघात स्थान देण्यात आले आहे. संघाचे नेतृत्व अलीकडेच मोहम्मद रिझवानकडून काढून शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे, जो आता एकदिवसीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
आउट ऑफ फॉर्म सलामीवीर सॅम अयुबला आणखी एक संधी दिली आहे. कर्णधार शाहीन आफ्रिदीसोबत नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनियर हे वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणार आहेत. अबरार अहमद फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. टी-२० कर्णधार सलमान अली आघाचा देखील एकदिवसीय संघात समावेश केला गेला आहे. जिथे तो फलंदाजी आणि चेंडू दोन्हीत योगदान देण्याची अपेक्षा आहे.
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, हरिस रौफ, फहीम अश्रफ, अबरार अहमद, फैसल अक्रम, हसीबुल्लाह, हसन नवाज, हुसेन तलत, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोनसीम शाह, सॅम अयुब, हम्मद वसीम ज्युनियर, सलमान अली आघा.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
४ नोव्हेंबर: पहिला एकदिवसीय सामना – इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
६ नोव्हेंबर: दुसरा एकदिवसीय सामना – इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
८ नोव्हेंबर: तिसरा एकदिवसीय सामना – इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका वेळापत्रक खालीलप्रमाणे
११ नोव्हेंबर: पहिला एकदिवसीय सामना – रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
१३ नोव्हेंबर: दुसरा एकदिवसीय सामना – रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
१५ नोव्हेंबर: तिसरा एकदिवसीय सामना – रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम






