विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शतक(फोटो-सोशल मीडिया)
India vs South africa 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आज शेवटचा आणि तिसरा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २७० धावा उभ्या केल्या आहेत. भारतीय संघ धावांचा पाठलाग करत आहे. दरम्यान भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक झळकवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक ठरले आहे.
विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरून सर्वबाद ३७० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने शतक झळकवले. तो ८९ चेंडूत १०६ धावा करून बाद झाला. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लागावले. क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कर्णधार टेम्बा बावुमाने ४८ धावा केल्या. इतर फलंदाज आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि र्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट काढली.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ३७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात दिमाखदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १५५ धावांची भागीदारी केली. या दरम्यान यशस्वी आणि रोहित शर्माने आपआपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रोहित शर्मा ७५ धावा काढून बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला केशव महाराजने बाद केले. त्यानंतर यशस्वी आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. या दरम्यान यशस्वी जयस्वालने एकदिवसीय कारकीर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. यशस्वी जयस्वालने १११ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारत आता विजयाच्या जवळ पोहचला आहे.
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृण्षा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि र्शदीप सिंग.
एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ओथनील बार्टमन, लुंगी एनगिडी.






