इंग्लंड ४३ धावांनी पिछाडीवर(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs ENG Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या दिवस-रात्र कसोटीत सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३३४ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात सर्वबाद ५११ धावा करत १७७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ६ विकेट्स गमावून १३४ धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ अजूनही ४३ धावांनी पिछाडीवर आहे.
तिसऱ्या दिवशी ६ बाद ३७८ वरुन ऑस्ट्रेलियाने पुढे आपला स्कोअर ५११ धावांपर्यंत पोहचवला आणि १७७ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने गोलंदाजीसह आपल्या फलंदाजीने देखील प्रभावित केले. त्याने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत धावसंख्या पुढे नेली. स्टार्कने १४१ चेंडूत ७७ धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत १३ चौकार लगावले. त्याआधी जेक वेदरलँडने ७२, मार्नस लॅबुशाने ६५, अॅलेक्स कॅरीने ६३ आणि स्टीव्ह स्मिथने ६१ धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सेने ४, बेन स्टोक्सने ३ आणि जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन आणि विल जॅक्सने प्रत्येकी १ बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५११ धावा केल्या आणि इंग्लंडवर १७७ धावांची आघाडी घेतली. धावांचा पाठलाग करायाल उतरलेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सहा विकेट गमावून १३४ धावा केल्या होत्या आणि ४३ धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला तेव्हा कर्णधार बेन स्टोक्स (४) आणि विल जॅक्स (४) नाबाद होते. इंग्लंडची दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली पण नंतर मात्र इंग्लंडचा डाव गडगडला. झॅक क्रॉलीअ आणि बेन डकेट या सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाठी ४८ धावांची भागीदारी रचली. बेन डके १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर झॅक क्रॉली ४४, ऑली पोप २६, जो रूट १५, हॅरी ब्रूक १५ ,जेमी स्मिथ ४ धावा करून बाद झाले. खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने आपले ६ गडी गमावून १३४ धावा केल्या होत्या, तर बेन स्टोक्स ४ धावा आणि विल जॅक्स ४ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि मायकेल नेसर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरॉल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, विल जॅक्स, ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर






