इंग्लंड महिला संघ(फोटो-सोशल मिडिया)
IND W vs ENG W : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंड ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर, भारतीय महिला संघ १६ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथहॅम्प्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आपला संघ जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान अनेक खेळाडू इंग्लिश संघात परतताना दिसून आले आहेत.
भारताविरुद्धच्या टी-२० मालिके दरम्यान इंग्लिश कर्णधार नॅट सिव्हर ब्रंट अचानक दुखापतग्रस्त झाली होती. आता ती एकदिवसीय मालिकेत परतली आहे. याशिवाय, कर्णधार नॅट सिव्हर ब्रंट व्यतिरिक्त, अष्टपैलू सोफी एक्लेस्टोन आणि माया बाउचर यांना देखील भारताविरुद्धच्या १५ सदस्यीय इंग्लंड महिला संघात स्थान मिळाले आहे.
संघाची घोषणा करताना इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक चार्लोट एडवर्ड्स म्हणाले की, “टी-२० मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात आम्ही दबावाखाली खेळलो आहोत. अशा परिस्थितीत, आपल्याला एक संघ म्हणून खूप काही शिकावे लागणार आहे. पण एकदिवसीय मालिकेत आम्हाला आमच्या संघातील खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत.”
तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडची कर्णधार नॅट सेव्हर ब्रंट अचानक जखमी झाली होती. त्यानंतर ती मालिकेतून बाहेर पडली आणि संघासाठी उर्वरित तीन सामने तिला खेळता आले नाहीत. त्याच वेळी, आता इंग्लंड संघाच्या व्यवस्थापनाकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. की त्यांच्या संघाची कर्णधार पूर्णपणे तंदुरुस्त झाली असून एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेला १६ जुलैपासून सुरवात होणार आहे. हा मालिकेतील पहिला सामना असेल, जो साउथहॅम्प्टनमधील रोझ बाउल मैदानावर खेळला जाणार आहे. यानंतर, दुसरा सामना १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना २२ जुलै रोजी ली स्ट्रीट मैदानावर खेळवला जाणार आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘एजबॅस्टन कसोटी विजय गोड..’, टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया चर्चेत
नॅट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, एम आर्लॉट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, माया बाउचर, केट क्रॉस, अॅलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, एमी जोन्स, एम्मा लॅम्ब, लिन्सी स्मिथ. I