Middle East War : मध्यपूर्वेत हाहाकार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला 'महाभयंकर प्लॅन' (फोटो सौजन्य: एक्स/@kbsalsaud)
या भेटीमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या सुरक्षा व संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी प्रादशिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे.
इराणकडून सध्या आखाती देशांवर हल्ले होत आहेत. ज्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर चिंता व्यक्त करत प्रिन्स खालिद यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये रणनीतिक संरक्षण कराराअंतर्गत आवश्यक पावले उचलण्यावर चर्चा झाली. अशा प्रकारच्या घटना प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण करतात.
यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ(Shehbaz Sharif) यांनी सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारशी उर्जा पुरवठ्यावरही चर्चा केली होती. सध्या पाकिस्तानमध्ये मध्यपूर्वेतील तणावामुळे आणि होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाचा पुरवठा अपुरा पडत आहे. यामुळे सौदी अरेबिया पाकिस्तानला अखंड तेल पुरवठा सुरु ठेवणार आहे.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 2025 सप्टेंबरमध्ये रणनीतिक परस्पर संरक्षण करार करण्यात आला होता. या करारानुसार एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. त्यामुळे या भेटीत दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरु केली होती. तेव्हापासून मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले आहेत. तसेच अनेक इस्रायली तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहेत. विशेष करुन इराणने होमुर्झ सामुद्रधुनी बंद केली असल्याने जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे जगातिक अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
Ans: मध्यपूर्वेत अमेरिका-इराणमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.
Ans: इराणने सौदी अरेबिया, युएई यांसारख्या आखाती देशांवर उर्जा वाहूतक मार्ग आणि लष्करी मालमत्तेवर हल्ले केले आहेत. विशेष करुन मध्यपूर्वेतील अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांनाच घेरण्यात आले आहे.
Ans: या करारांतर्गत दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल. तसेच दोन्ही देशांत एकमेकांना मदत करतील.






