Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W : भारताविरुद्ध विश्वचषक फायनलचा सामना गमावला पण मनं जिंकली… पराभवानंतर केलं लॉरा वोल्वार्डने भावूक विधान!

क्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्डने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली आणि ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. पराभवानंतरही, लॉराने तिच्या कामगिरीने आणि सामन्यानंतरच्या विधानाने चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 03, 2025 | 01:46 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:
  • फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वोल्वार्ड ठोकले शतक
  • दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला
  • २०२५ च्या महिला विश्वचषकात लॉरा वोल्वार्ड सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली

South Africa captain Laura Wolvaardt won the hearts of fans: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला विश्वचषक 2025 चा फायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांची तर दमदार कामगिरी राहिलीच त्याच फलंदाजांनी देखील कमाल केली. भारताच्या संघाने ट्राॅफी जिंकून इतिहास घडवला पण दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वोल्वार्ड ही तिच्या संघाकडून शेवटपर्यत एकटीच लढत राहिली आणि तिने शतक झळकावले. 

महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्डने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली आणि ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. पराभवानंतरही, लॉराने तिच्या कामगिरीने आणि सामन्यानंतरच्या विधानाने चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला.

कॅप्टन हरमनने विजयानंतर गुरु अमोल मुझुमदार यांचे धरले पाय, मिठी मारली अन् झाले दोघेही भावूक, Video Viral

२०२५ च्या विश्वचषकात लॉराने तिच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली

२०२५ च्या महिला विश्वचषकात लॉरा वोल्वार्ड सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तिने नऊ सामन्यांमध्ये ७१.३८ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या. महिला विश्वचषकाच्या अंतिम आणि उपांत्य फेरीत शतके झळकावणारी अ‍ॅलिसा हीलीनंतर दुसरी खेळाडू बनून लॉराने स्पर्धेत इतिहास रचला. २०२२ मध्ये हीलीने हा पराक्रम केला होता आणि आता २०२५ मध्येही लॉराने हाच पराक्रम केला आहे. तिने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरीत लॉराने शेवटपर्यंत टिकून राहून शतक ठोकले. जरी ती हरली असली तरी तिने तिच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली.

DY Patil crowd cheering up Laura Wolvaardt for her heroics. 👏 pic.twitter.com/o8bc5ZyW8Q — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2025

विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल वोल्वार्ड काय म्हणाली?

अंतिम सामन्यातील पराभवानंतर लॉरा वोल्वार्ड्टचे भावनिक विधान आले. तिने टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि तिच्या संघाच्या पराभवाबद्दल निराशा व्यक्त केली. ती म्हणाली, “मला या संघाचा अभिमान वाटू शकत नाही. टीम इंडियाने खरोखरच चांगले क्रिकेट खेळले. आम्ही हरलो हे निराशाजनक आहे, परंतु एक गट म्हणून, आम्ही भविष्यात यातून बरेच काही शिकू. आम्ही त्या वाईट सामन्यांना मागे टाकण्याचे उत्तम काम केले. काही सामने खूप चांगले होते, तर काही खूप वाईट होते. तथापि, बहुतेक वेळा गोष्टी खरोखरच चांगल्या झाल्या.”

Web Title: Ind w vs sa w lost the world cup final match against india but won the hearts laura wolvaardt century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND VS AUS
  • Laura Wolvaardt
  • Sports
  • Video Viral
  • Women's World Cup

संबंधित बातम्या

Photo : दीप्ती शर्माने असे केले जे आजपर्यंत केवळ महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरुष क्रिकेटमध्येही घडले नाही!
1

Photo : दीप्ती शर्माने असे केले जे आजपर्यंत केवळ महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरुष क्रिकेटमध्येही घडले नाही!

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर
2

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर

Harmanpreet Kaur Net Worth : विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर करोडोंची मालिकीण! लग्जरी कार-आलिशान बंगला…
3

Harmanpreet Kaur Net Worth : विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर करोडोंची मालिकीण! लग्जरी कार-आलिशान बंगला…

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड
4

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.