
photo- social media
अफगाण संघाच्या गझनफरने टाकलेल्या सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने मिड-विकेटच्या दिशेने एक जलद धाव घेण्याचा प्रयत्न केला. शॉट मारल्यानंतर, शुभमन गिल रोहितकडे न पाहता चेंडूकडे पाहत होता, दरम्यान तो क्रीजवरच थांबला. गोलंदाजाच्या फॉलो-थ्रूमुळे आपली क्रीझ ओलांडता आली नाही. त्यानंतर त्याने स्ट्रायकरच्या एऩ्डकडे परत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच विकेटकीपरने थ्रो पकडला आणि बेल्स उडवल्या आणि रोहित रनआऊट झाला. रोहितने १६ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या होत्या. बाद झाल्यानंतर रोहित शर्मा स्पष्टपणे संतापला होता आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच, शुभमन गिलकडे न पाहताच तो पॅव्हेलियनकडे निघून गेला. रोहितच्या डोळ्यात निराशेची भावना स्पष्टपणे दिसत होती. या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यासाठी तो आतुर होता.
रोहित १६ धावांवर बाद झाला तरीही त्याने आणखी एक रेकॉर्ड मोडला. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. रोहितच्या आधी, ही कामगिरी केवळ माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने केली होती.
गिलसोबतच्या ताळमेळाच्या अभावामुळे रोहित शर्मा धावबाद झाला. सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर रोहित त्याच्यावर रागावला होता का, असे शुभमन गिलला विचारले असता, तो म्हणाला, ‘रोहितने रिप्ले पाहिला आणि म्हणाला की सर्व काही ठीक आहे. मागच्या वेळी जेव्हा आम्ही अफगाणिस्तानविरुद्ध खेळलो होतो, तेव्हाही रोहित टी-२० मध्ये धावबाद झाला होता.’
This is Shubman Gill again. 😭💔 – The same way he got Rohit Sharma run out against Afghanistan earlier, he was involved in another run-out today. Looks like he still hasn’t learned from it. pic.twitter.com/AYDBJQHPED — Captain Rohit Sharma Fan (@TheCaptainR45) June 13, 2026
धर्मशाळा येथील सामना पावसामुळे अनेक तास उशिरा सुरू झाला. मुसळधार पावसामुळे षटकांची संख्या प्रत्येकी २५ पर्यंत कमी करण्यात आली. अफगाणिस्तानकडून, रहमानुल्ला गुरबाजने सर्वात जलद एकदिवसीय शतक ४८ चेंडूंमध्ये झळकावून इतिहास रचला. त्याच्या शतकामुळे अफगाणिस्तानने १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताचा कर्णधार शुभमन गिल ८४ धावांवर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय, इशान किशनने ३४ धावा केल्या आणि अखेरीस केएल राहुलने १९ चेंडूंमध्ये ३९ धावांची धडाकेबाज खेळी करून भारताचा विजय निश्चित केला.