ICC चॅम्पियन्स ट्रॉफी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे आयोजन केले जाणार आहे. परंतु ICC समोर सर्वात मोठी समस्या म्हणजेच भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? कारण सुरक्षेच्या कारणामुळे बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्ससाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार असल्याचा पुनरुच्चार अनेकदा केला आहे. जर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये गेला नाही तर आणखी कोणते पर्याय आहे? यावर बीसीसीआयचे म्हणणे आहे की, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जावी, जेणेकरून भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची गरज भासणार नाही.
[read_also content=”भारताचा संघ शेवटच्या साखळी सामन्यासाठी रवाना, फ्लोरिडातील सामने रद्द होणार की हवामान बदलणार? https://www.navarashtra.com/sports/indian-team-leaves-for-last-match-will-matches-in-florida-be-canceled-or-will-the-weather-change-547889.html”]
हायब्रीड मॉडेल की पाकिस्तान?
पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या आग्रहावर ठाम सुद्धा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे भारताच्या संघाने पाकिस्तानला जावे आणि पाकिस्तानविरुद्ध खेळावे. परंतु असे शक्य आहे का? यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे म्हणणे आहे की, आम्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, तर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करावी. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताची हायब्रीड मॉडेलची सूचना पूर्णपणे नाकारली आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डला कोणत्याही किमतीत ही स्पर्धा आपल्या भूमीवर आयोजित करायची आहे.
पीसीबीचे म्हणणे काय?
मीडियाच्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे म्हणणे आहे की, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे. कारण पाकिस्तानला या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान आयोजन करायचे आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमधील ३ मैदानावर खेळवली जाणार आहे. यामध्ये कराचीशिवाय रावळपिंडी आणि लाहोरचाही समावेश आहे. पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही. आशिया चषक २०२४ पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती परंतु नंतर बीसीसीआयने आपला संघ पाठवण्यासाठी नकार दिल्यामुळे श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.