Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Kabaddi World Cup: भारतीय पोरींचा गाजावाजा! कबड्डी विश्वचषक जिंकून रचला इतिहास, महिला टीमची ‘डबल हॅटट्रिक’

India vs Chinese Taipei Final: भारतीय महिला संघाने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने आपले सर्व ग्रुप सामने मोठ्या फरकाने जिंकले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 24, 2025 | 08:21 PM
भारतीय पोरींचा गाजावाजा! कबड्डी विश्वचषक जिंकून रचला इतिहास (Photo Credit - X)

भारतीय पोरींचा गाजावाजा! कबड्डी विश्वचषक जिंकून रचला इतिहास (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • विश्वचषक विजयाची ‘डबल हॅटट्रिक’!
  • भारतीय महिला कबड्डी संघाने ढाकामध्ये चीन तैपेईला धूळ चारली
  • सलग दुसऱ्यांदा जगावर गाजवले वर्चस्व!
Indian Women’s Kabaddi Team Champions: ढाका (Dhaka) येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक (Women’s Kabaddi World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने चीन तैपेईला (Chinese Taipei) ३५-२८ अशा फरकाने पराभूत करून पुन्हा एकदा जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महिला कबड्डीमध्ये देशाची वाढती ताकद आणि श्रेष्ठता सिद्ध करणारे हे भारताचे सलग दुसरे विश्वचषक विजेतेपद आहे.

संपूर्ण स्पर्धेत भारताचा दबदबा

भारतीय महिला संघाने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने आपले सर्व ग्रुप सामने मोठ्या फरकाने जिंकले. उपांत्य फेरीत भारतीय संघाने बलाढ्य इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात चीन तैपेईला मात देऊन भारताने दिमाखात विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, चीन तैपेईनेही आपले सर्व लीग सामने जिंकले होते आणि उपांत्य फेरीत यजमान बांग्लादेशला २५-१८ ने हरवून ते अंतिम फेरीत पोहोचले होते.

🚨 THIS IS PRETTY HUGE NEWS FOLKS 💥 WORLD CUP WINNING MOMENTS FOR INDIA 🏆 Indian Women’s Team defeated Chinese Taipei 35-28 in the Finals of Kabaddi World Cup 2025! Our Girls successfully defends the Trophy 🇮🇳💙 pic.twitter.com/rEp45Qu6aW — The Khel India (@TheKhelIndia) November 24, 2025

हे देखील वाचा: अखेर दुष्काळ संपला! लक्ष्य सेनने Australian Open च्या जेतेपदावर कोरले नाव; अंतिम सामन्यात जपानच्या युशी तनाकाचा केला पराभव 

दिग्गजांकडून भारतीय संघाचे कौतुक

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कबड्डी क्षेत्रातील दिग्गजांनी संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे:

मनप्रीत सिंग (हेड कोच, हरियाणा स्टीलर्स): “महिला टीमने असा प्रदर्शन केला आहे, ज्यावर संपूर्ण देशाला अभिमान वाटू शकतो. त्यांचा आत्मविश्वास आणि सांघिक कार्य (Teamwork) शानदार राहिले. एक माजी भारतीय खेळाडू म्हणून मला माहीत आहे की या स्तरावर पोहोचणे किती कठीण आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला खूप खूप शुभेच्छा!”

अजय ठाकूर (हेड कोच, पुनेरी पल्टन): “ढाकामध्ये महिला टीमने सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकणे, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फायनलपर्यंत त्यांचे वर्चस्व हे दाखवते की गेल्या काही वर्षांत महिला कबड्डीने किती प्रगती केली आहे. बांग्लादेशमध्ये वर्ल्ड कप झाल्यामुळे या खेळाची जागतिक लोकप्रियताही स्पष्टपणे दिसून येते. पुढील वर्षांमध्ये ही गती कायम राहील अशी आशा आहे.”

या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ मध्ये एकूण ११ देशांनी भाग घेतला होता, हे दर्शवते की महिला कबड्डी जागतिक स्तरावर किती वेगाने पुढे सरकत आहे.

भारताच्या मुलींनी ३० दिवसांत ३ विश्वचषक जिंकले

भारताच्या मुली सध्या संपूर्ण देशाचे नाव उंचावत आहेत. गेल्या ३० दिवसांत भारताने ३ विश्वचषक जिंकले आहेत. प्रथम, भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने अंध महिला टी२० विश्वचषकात असाधारण कामगिरी केली. त्यांनी अंतिम सामन्यात नेपाळला ७ विकेट्सने हरवून कोलंबोमध्ये अंध महिला टी२० विश्वचषक जिंकला. हा पहिलाच अंध महिला टी२० विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर, भारतीय महिला कबड्डी संघानेही विश्वचषक जिंकला.

हे देखील वाचा: T20 World Cup 2026 चे वेळापत्रक या दिनी होणार जाहीर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग

Web Title: India won the kabaddi world cup for the second consecutive time by defeating chinese taipei in the final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 08:21 PM

Topics:  

  • Kabaddi
  • Kabaddi Tournament 2024-25
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SA : ऋषभ पंतच्या निष्काळजीपणामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर संतापाचा भडका!
1

IND vs SA : ऋषभ पंतच्या निष्काळजीपणामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर संतापाचा भडका!

IND vs SA : एडेन मार्करामच्या जबरदस्त कॅचने नितीश कुमार रेड्डी झाला थक्क; Video Viral
2

IND vs SA : एडेन मार्करामच्या जबरदस्त कॅचने नितीश कुमार रेड्डी झाला थक्क; Video Viral

T20 World Cup 2026 चे वेळापत्रक या दिनी होणार जाहीर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग
3

T20 World Cup 2026 चे वेळापत्रक या दिनी होणार जाहीर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग

IND vs SA : भारतीय संघाचा Downfall सुरुच… टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी! यान्सनच्या गोलंदाजीसमोर फलंदाज कोसळले
4

IND vs SA : भारतीय संघाचा Downfall सुरुच… टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी! यान्सनच्या गोलंदाजीसमोर फलंदाज कोसळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.