फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Men’s T20 World Cup 2026Schedule : पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका टी२० विश्वचषक आयोजित करतील. टीम इंडिया गतविजेत्या म्हणून स्पर्धेत प्रवेश करेल आणि त्यांचे जेतेपद राखण्याचे ध्येय ठेवेल. या विश्वचषकात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम केले आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. पण या स्पर्धेचे वेळापत्रक आतापर्यत जाहीर करण्यात आले नाही.
भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, या गटात अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सचे संघ आहेत. आयसीसीने या गटातील सामन्यांच्या तारखा देखील अंतिम केल्या आहेत. 25 नोव्हेंबर रोजी आयसीसी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. अनेक वृत समोर आली आहेत आता या वेळापत्रकाची देखील लाईव्ह स्ट्रिमिंग क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषक 2026 चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. टी२० विश्वचषक 2026 चे वेळापत्रक 25 नोव्हेंबर रोजी आयसीसी अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. या वेळापत्रकाची लाईव्ह स्ट्रिमिंग ही स्टार स्पोर्ट्सवर केली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या वेळापत्रकाची लाईव्ह स्ट्रिमिंग 6.30 मिनिटांनी संध्याकाळी होणार आहे.
वेळापत्रक जाहीर करताना स्टार स्पोर्ट्सवर टीम इंडियाचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, सुर्यकुमार यादव त्याचबरोबर अॅगलो मॅथ्यूज हे पाहायला मिळणार आहेत.
A schedule reveal like never before! 😍 Join us with @ImRo45, @Angelo69Mathews, @surya_14kumar, & @ImHarmanpreet
for the grand unveiling of the ICC #T20WorldCup 2026 fixtures! 🔥 pic.twitter.com/1uDUiGAuMV — Star Sports (@StarSportsIndia) November 24, 2025
टीम इंडिया ८ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अमेरिकेशी सामना करेल. १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाशी सामना करेल. स्पर्धेतील सर्वात हाय-व्होल्टेज सामन्यात भारत आणि पाकिस्तान १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये आमनेसामने येतील. १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत भारताचा सामना नेदरलँड्सशी होईल.






