फोटो सौजन्य - हॉकी इंडिया
भारतीय हॉकी संघ : भारताच्या हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला शूटआऊटमध्ये पराभूत करून सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी करून सामना शूटआऊटमध्ये गेला आणि यामध्ये भारताच्या हॉकी संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा ग्रेट ब्रिटनचा प्रभाव करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनविरुद्ध घेतली १-० अशी आघाडी घेतली होती त्यानंतर भारताचा अनुभवी रशर अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आले आहेत. भारतीय हॉकी संघासाठी हा मोठा धक्का आहे.
INDIA DEFEATS GREAT BRITAIN | ENTER SEMIFINAL
Playing with 10 men through the three quarters India held on to the 1-1.
And then We Had Sreejesh #TheLegend#Hockey #IndiaAtOlympics pic.twitter.com/wriGKuYtrR
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 4, 2024
भारताच्या संघाच्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कामगिरीचा विचार केला तर संघाने आतापर्यत फक्त १ सामना बेल्जीयम विरुद्ध गमावला आहे. तर एक सामना अर्जेन्टिना विरुद्ध ड्रॉ झाला होता. भारताने साखळी सामन्यांमध्ये न्यूझीलंडला ३-२ अशी मात दिली होती. तर आयर्लंडला २-० असे पराभूत करून सामना एकतर्फी जिंकला होता. बेल्जीयम विरुद्ध भारतीय हॉकी संघाला २-३ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया ५२ वर्षानंतर हरवल्यानंतर अर्धशतक दुष्काळ संपवला.
यंदा पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीचा विचार केला तर संघाने आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे भारताच्या संघाला या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. भारताच्या या दमदार कामगिरीमुळे संघाचे जगभरमध्ये सोशल मीडियावर कौतुक होत आहे.