फोटो सौजन्य - ANI
टीम इंडिया : T२० विश्वचषकाचा शेवटचा सामना (T-20 World Cup 2024) आणि शेवटचा टप्पा आता २८ जून रोजी पार पडणार आहे. विश्वचषकातील दोन बलाढ्य आणि अपराजित संघ एकमेकांसमोर आव्हान उभे करणार आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. या दोन्ही संघानी ही विश्वचषकातील स्पर्धा एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फायनलचा सामना बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. यासाठी भारतचा संघ बार्बाडोसला पोहोचला आहे. नुकताच एक व्हिडीओ टीम इंडियाचा समोर आहे आला.
भारताच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये विश्वविजेता इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडिया आता फायनलच्या संघासाठी सज्ज आहे. ANI च्या X अकाउंटवर टीम इंडियाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू विमानतळावर दिसत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह आणि द्रविड यांच्यासह टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ बार्बाडोसला पोहोचला आहे.
#WATCH | Indian cricket team arrived in Barbados ahead of their T20 World Cup Final match against South Africa on 29 June pic.twitter.com/6QTaiu9aVT
— ANI (@ANI) June 28, 2024
भारताला शनिवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. या T२० विश्वचषकात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही.
सेमीफायनल २ चा सामना काल पार पडला. या उपांत्य फेरीमध्ये भारताचा सामना इंग्लडविरुद्ध झाला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडला ६८ धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आहे. तर इंग्लंडच्या संघाला १०३ धावांवर ऑलआऊट केले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अप्रतिम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमुळे भारताला सहज विजय मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने एकदाही फायनल गाठली नव्हती त्यामुळे त्यांनी इतिहास रचला आहे.