गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या एका वाहनाला आग लागली. या घटनेत कुठलीहीजिवित हानी झाली नसली तरी अपघातग्रस्त वाहन जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पेण नगरपालिका आणि जेएसडब्ल्यू कंपनीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचा फोटो होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्रसंगावधान राखत अग्नीशामन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबई गोवा महामार्गावर कुठेना कुठे अपघात हे होतच आहेत. कधी रस्त्यांची झालेली दुर्दशा तर वाहतूक कोंडी यामुळे दिवसेंदिवस हा महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे.
अपघात टाळण्यासाठी या महामार्गावर काही विकासकामं करण्यात येणार होती. मात्र काही ना काही कारणांनी ते लांबणीवर जात आहे. मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) फोरलेन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा लागणारा 12 ते 13 तासांचा प्रवास अवघ्या 6 तासांत होणार आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने विविध अडथळ्यांमुळे कामाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे. पनवेल ते सिंधुदुर्ग (Mumbai Goa Highway)असा सुमारे466 किलोमीटरचा हा महामार्ग कोकणातील पर्यटन, व्यापार आणि दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पनवेल ते इंदापूर हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआए) विकसित केला जात असून उर्वरित भाग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. प्रकल्पाला मुख्य अडथळे इंदापूर दरम्यान सुमारे ३ किलोमीटर व माष्णगाव येथे सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या बायपास रस्त्यांमुळे निर्माण झाले आहेत.
बायपास अभावी चालकांना सतत सावधगिरी बाळगावी लागत असल्याने प्रवास अचिक त्रासदायक ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 फ्लायओव्हर मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. जरी एकूण प्रकल्पाची मुदत 2026 अशी निश्चित करण्यात आली असली, तरी सद्याद्यस्थितीत आणखी विलब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नवीन टेंडर प्रक्रिया आणि पर्यायी उपाययोजना सबवण्याचे प्रधान सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे. लवकरच हा महामार्ग सुरक्षित, सुकर आणि जलद प्रवासाचा पर्याय बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






