मुंबई महापालिकेवर महिला राज येणार असून सर्वसाधारण गटातील महिला महापौर होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मागील 25 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे मुंबईवरील सत्ता गेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर होण्याची मोठी शक्यता आहे. यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांनी हॉटेल पॉलिटिक्सचा डाव खेळल्यामुळे रंगत वाढली आहे. यामध्ये आता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. १७ पैकी ९ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर विराजमान होईल. सगळ्यांचं लक्ष लागलेली मुंबई महापालिकेसाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडतीत निघाले. मुंबईमध्ये सर्वसाधारण गटातील महिला महापौर होणार आहे.
हे देखील वाचा : महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, तुमच्या शहराचा महापौर कोण? वाचा संपूर्ण यादी
राज्यातील २९ महानगरपालिकेत ५० टक्के आरक्षणाचा नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होईल.
हे देखील वाचा : राजकीय घडामोडींना वेग! KDMC शिंदे सेना अन् मनसेच्या युतीने ठाकरेसेना नाराज, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल
कोणत्या महापालिकेमध्ये कोणता महापौर? वाचा यादी
आरक्षणाचे गणित






