सौजन्य - gssjodhpur भारताची स्टार बॅडमिंटनपटूने व्यंकट दत्ता साई यांच्यासोबत केल लग्न
PV Sindhu Wedding Pics : भारताची स्टार बॅडमिंटनपटू तथा ऑलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधू ही लग्नबंधनात अडकली आहे. तिने आयटी व्यावसायिक व्यंकट दत्ता साईशी लग्न केले. हे लग्न उदयपूरमध्ये पारंपरिक तेलगू रितीरिवाजानुसार पार पडले. लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे. सिंधू आणि दत्ता साई हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. सिंधूने 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
तेलुगु रितीरिवाजात पार पडला सोहळा
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे लग्न झाले. तिने रविवारी उदयपूरमध्ये हैदराबादच्या उदमी व्यंकट दत्ता साईसोबत सात फेरे घेतले. हे लग्न पारंपरिक तेलुगू रितीरिवाजात कुटुंब आणि मित्रमंडळींमध्ये पार पडले. या लग्नाची काही झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद दिले आणि लग्नातील एक फोटोदेखील शेअर केला.
गजेंद्र सिंह शेखावत लग्नसोहळ्याला उपस्थित
फोटो शेअर करीत गजेंद्र सिंह शेखावत यांनी लिहिले की, काल संध्याकाळी उदयपूरमध्ये आमची बॅडमिंटन चॅम्पियन ऑलिम्पियन पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहून मला खूप आनंद झाला आणि मी या जोडप्याला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
भाजप नेते तथा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी विवाहला लावली उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात 20 डिसेंबर रोजी
सिंधू आणि दत्ता साई 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. 20 डिसेंबर रोजी संगीत समारंभाने लग्नाच्या विधींना सुरुवात झाली, त्यानंतर हळदी, पेलीकुथुरु आणि मेहेंदी समारंभ पार पडला. सिंधूने क्रीम रंगाची साडी घातली, तर दत्ता साईने मॅचिंग क्रीम रंगाची शेरवानी घातली. सिंधूच्या वडिलांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात, पण लग्नाची तयारी अवघ्या एका महिन्यात पूर्ण झाली. सिंधूचे व्यस्त प्रशिक्षण आणि स्पर्धेचे वेळापत्रक पाहता लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली.
हेही वाचा : Pro Kabaddi League : बंगळुरू बुल्स आणि तमिळ थलाईवाजचे प्लेऑफचे स्वप्न संपुष्टात
सिंधू दोन वेळा ऑलिम्पिकपदक विजेती
भारतीय क्रीडा इतिहासातील महान महिला खेळाडूंमध्ये पीव्ही सिंधूची गणना केली जाते. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. यानंतर सिंधूने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. त्याने 2019 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपदही जिंकले.
हेही वाचा : Pro Kabaddi League : यु मुम्बाला हरियाणा स्टिलर्सने पराभूत करून उपांत्य फेरीत केला प्रवेश