फोटो सौजन्य - ProKabaddi सोशल मीडिया
तमिळ थलाईवाज विरुद्ध बंगळुरू बुल्स : कालच्या दिनी प्रो कब्बडी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे दोन सामने झाले, यामध्ये पहिल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्स विरुद्ध यु मुम्बा यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये हरियाणा स्टिलर्सने यु मुम्बाचा पराभव करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसरा सामना तमिळ थलाईवाज विरुद्ध बंगळुरू बुल्स या दोन संघामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यांमध्ये तमिळ थलाईवाज संघाने बंगळुरू बुल्सवर ४२-३२ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये शानदार विजय मिळविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या तमिळ थलाईवाज विरुद्ध बंगळुरू बुल्स या दोन्ही संघांचे प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न यापूर्वी संपुष्टात आले आहे. तमिळ संघाने यापूर्वी झालेल्या वीस सामन्यांमध्ये फक्त सातच सामने जिंकले आहेत तर बंगरूळ संघाने तेवढ्या सामन्यांमध्ये फक्त दोनच सामन्यांमध्ये विजय मिळण्यात यश मिळवले आहे. या स्पर्धेत यशस्वी सांगता करण्यासाठीच उर्वरित सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक होते. त्यामुळेच आजच्या सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस दिसून आली. आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सातत्याने प्रयत्न करीत होते मध्यंतराला तमिळ संघाकडे १४-१३ अशी केवळ एक गुणाची आघाडी होती.
சீக்கிரம் கிடைத்த புத்தாண்டு கிஃப்ட் இது 🥹 தரமான ஆட்டம் #TamilThalaivas 💛❤️#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls pic.twitter.com/9MfaNtRXjh
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2024
उत्तरार्धात तमिळ संघाच्या खेळाडूंनी जोरदार खेळ करत आपली आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगळुरू संघाच्याही खेळाडूंनी जिद्द सोडली नाही. ३० व्या मिनिटाला तमिळ संघाकडे २३-१९ अशी आघाडी होती. पुढच्याच मिनिटाला त्यांनी पहिला लोण चढवीत आपली आघाडी आणखी वाढवली. त्यांनी शेवटची सहा मिनिटे बाकी असताना आणखी एक लोण चढवीत आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे ३७-२३ अशी आघाडी होती. शेवटच्या मिनिटाला बंगळुरू संघाला लोण नोंदवण्याची संधी मिळाली होती मात्र तमिळ संघाच्या खेळाडूंनी त्यांना या संधीपासून वंचित ठेवले.
Pro Kabaddi League : यु मुम्बाला हरियाणा स्टिलर्सने पराभूत करून उपांत्य फेरीत केला प्रवेश
तमिळ संघाकडून चढाईमध्ये यांना गुणांचे शेतात नोंदविणारा मोईन शफागे व हिमांशू यांनी जोरदार चढाया केल्या. अमीर हुसेन यांनी उत्कृष्ट पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. बंगळुरू संघाकडून सुशील याने पकडी मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली तर नितीन रावळ याने अष्टपैलू खेळ केला मात्र त्यांचा कर्णधार परदीप नरवाल याला अपेक्षेइतके यश मिळाले नाही.
आज प्रो कबड्डीचे दोन सामने रंगणार आहेत. यामध्ये पहिला सामना गुजरात गायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना तमिळ थलाईवाज विरुद्ध पुणेरी पलटण हे दोन संघ भिडताना दिसणार आहेत. पहिला सामना ८ वाजता सुरु होणार आहे तर दुसरा सामना ९ वाजता सुरु होणार आहे.