कुलदीप सेन(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs PBKS : आज पंजाब किंग विरुद्ध एलएसजी यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या निमित्ताने चर्चेत आलेला पंजाब किंग्जचा वादळी खेळाडू कुलदीप सेनबद्दल आपण जाणून घेऊया. कुलदीप सेनचा जन्म २२ ऑक्टोबर १९९६ रोजी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील हरिहरपूर गावात झाला, जिथे त्याचे वडील रामपाल सैन न्हावी होते आणि कुटुंबाचे उत्पन्न एका लहान सलून दुकानातून येत असे. वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेटची आवड होती, पण त्याच्याकडे महागडे बूट नव्हते आणि सरावाच्या सुविधा देखील नव्हत्या. तरीही, त्याच्या आवडीने त्याला पुढे जाण्यास मदत केली.
कुटुंबाचा पाठिंबा, प्रशिक्षकांचे आशीर्वाद
सुरुवातीला त्याच्या वडिलांना क्रिकेट आवडत नव्हते, परंतु त्याची आई आणि प्रशिक्षक एरिल अँथनी यांनी त्याला पाठिंबा दिला. अँथनीने त्याची फी माफ केली आणि त्याला वेगवान गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
आयपीएलमध्ये चमक, दुखापती अडथळा
२०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांना खरेदी केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटच्या षटकात १५ धावांचे रक्षण करून संघाला विजय मिळवून दिला, हा क्षण चाहत्यांच्या आठवणीत अजूनही ताजा आहे.
2024 च्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने कुलदीपला ८० लाख रुपयांना त्यांच्या संघात सामील केले होते. ही किंमतच त्यांच्या क्षमता आणि भविष्यातील अपेक्षा प्रतिबिंबित करते. परंतु 2025 कायम ठेवले नाही (कारण संधाने फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवले होते शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग), परंतु लिलावात मात्र त्याला त्याच मूल्यात विकत घतेले.