MI vs KKR Highlights : कालच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करीत २४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघ १९.५ षटकांत १६९ धावाच करू शकला. ज्यामध्ये व्यंकटेश अय्यरने ७० धावा तर मनीष पांडेने ४२ धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआरकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने ४ तर आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे.
A memorable win for @KKRiders 🥳
They wrap up a solid performance to get past the #MI challenge 💜 💪
Scorecard ▶️ https://t.co/iWTqcAsT0O#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/YT6MGSdPkj
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024
मुंंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिकची कबुली
मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने या लाजिरवाण्या पराभवानंतर वक्तव्य दिले आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “आम्ही चांगली भागीदारी करू शकलो नाही आणि सातत्याने विकेट गमावल्या, ज्याचा ट्वेन्टी२० मध्ये फटका बसतो. मनात खूप सारे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मिळायला वेळ लागेल. पण आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. गोलंदाजांनी खरोखरचं चांगली कामगिरी केली, पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगली झाली. दवही आलं. यानंतर आम्ही आणखी काय चांगलं करू शकतो याचा विचार करू. संघर्ष करत राहणं हे माझं काम आहे, मी नेहमी स्वतला हेच सांगत असतो. आव्हानं येत राहणार, संघर्ष करत राहीन.”
कोलकाता नाईट रायडर्सने १० सामन्यांत ७ विजय
या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने १० सामन्यांत ७ विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांचे १४ गुण आहेत. केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून काही पावले दूर आहे. तर मोठ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे ११ पैकी ३ विजय आणि ८ पराभवानंतर केवळ ६ गुण मिळवले आहेत आि संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे.