मुंबई : येत्या काही दिवसांमध्येच आयपीएल हंगामाची सुरुवात होणार आहे. आगामी IPL 2024 ची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. मागील दोन हंगामामध्ये सनरायझर्स हैद्राबादची कामगिरी निराशाजनक राहिली. यावरूनच सनरायझर्स हैद्राबादने आक्रमक पवित्रा घेत आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. सनरायझर्स हैद्राबादने प्रथम कॅप्टन बदलल्यानंतर आता त्यांच्या जर्सीमध्येसुद्धा बदल केला आहे.
पुन्हा एकदा सूर गवसणं काही शक्य नाही
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने एकदा जेतेपदावर नाव कोरलं होते. पण, त्यानंतर पुन्हा एकदा सूर गवसणं काही शक्य झालं नाही. त्यामुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर केलं. इतकंच काय तर त्याला रिलीजही करून टाकलं. त्यानंतर इतर खेळाडूंकडे जशी गरज तशी कर्णधारपदाची धुरा सोपवली गेली.
सनरायझर्स हैद्राबादचे खेळाडू नव्या जर्सीसह उतरणार मैदानात
काही दिवसांपूर्वी एडन मार्करम याच्याकडून नेतृत्वाची धुरा काढून पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. त्यामुळे संघात उलथापालथ होत असताना नवी जर्सी समोर आली आहे. या बदलाचा भाग आणि खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतूने नवी जर्सी सादर केली आहे. या पर्वात सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू नव्या जर्सीसह उतरणार आहेत.
Fire kit. Fire player. All set for a fiery #IPL2024 😎🔥#PlayWithFire pic.twitter.com/DCPpfVkUas — SunRisers Hyderabad (@SunRisers) March 7, 2024
भुवनेश्वर कुमारचा फोटो सनरायझर्सने सोशल मीडियावर
सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीकडे बघता क्षणी आगीचं प्रतिक दिसून येईल. ज्वाला निघत असल्याचा भस होईल.आकर्षक आणि दोलायमान डिझाईनसह ही जर्सा सादर करण्यात आली आहे. नवी जर्सीसह स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा फोटो सनरायझर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच एक व्हिडिओही शेअर केला. फायर किट, फायर प्लेयर आयपीएल 2024 साठी ऑल सेट असे शीर्षक दिलं आहे.
New 𝐥𝐨𝐨𝐤, new 𝐭𝐡𝐫𝐞𝐚𝐝𝐬 and all ready to #𝐏𝐥𝐚𝐲𝐖𝐢𝐭𝐡𝐅𝐢𝐫𝐞 🔥 pic.twitter.com/XzTS1H5Kcg — SunRisers Hyderabad (@SunRisers) March 7, 2024
सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कॅप्टन पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. न्यूझीलंडने माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. 2016 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स संघाचे नशिब यावेळच्या बदलांमुळे बदलणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
हैदराबादचा संपूर्ण संघ
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम , मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.