फोटो सौजन्य – X
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामनांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. याआधी भारताचा अ संघ हा इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळला. इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये अनेक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली यामध्ये युझवेंद्र चहल याचा देखील समावेश होता. चहलने पंजाब किंग्ससाठी तर आयपीएल 2025 मध्ये हॅट्ट्रिक घेतली. त्यानंतर तो काही सामन्यात संघाबाहेर होता कारण त्याच्या हाताला दुखापत झाली होती. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांवर जोरदार टीका झाली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेदरम्यान, अनेक भारतीय खेळाडू काउंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळत आहेत. जिथे खेळणारे सर्व स्टार खेळाडू सध्या पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका भारतीय स्टार स्पिनरला काउंटीमध्ये वाईट पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे, या खेळाडूला पुनरागमन करणे खूप कठीण झाले आहे.
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायर आणि केंट यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात स्टार भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल देखील खेळत आहे. बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर असलेला चहल काउंटीमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये पुनरागमन करू इच्छितो, परंतु सध्या तो त्यात अपयशी ठरत आहे. नॉर्थम्प्टनशायरसाठी पहिल्या डावात चहलने ४२ षटके टाकली. ज्यामध्ये त्याने एकही विकेट न घेता १२९ धावा दिल्या. तथापि, गेल्या काउंटी हंगामात चहल यशस्वी झाला होता, त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. युझवेंद्र चहल सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही.
IND vs ENG : दुसऱ्या सामन्यात भारतीय युवा संघाच्या हाती निराशा! 1 विकेट केला इंग्लिश संघाने पराभव
युजवेंद्र चहलच नाही तर वेगवान गोलंदाज खलील अहमदही काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. खलील अहमद एसेक्स आणि यॉर्कशायर यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात खेळत आहे. एसेक्सचा गोलंदाज खलीलने एकूण ९ षटके टाकली आहेत. ज्यामध्ये त्याने ४० धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तथापि, भारतीय फलंदाजही काउंटीमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. तिलक वर्मा आणि इशान किशन या दोघांनीही त्यांच्या पदार्पणाच्या डावात फलंदाजीने अद्भुत कामगिरी केली आहे.