फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा सुरु झाली आहे, भारताचा पहिला सामना हा यूएईविरुद्ध पार पडला. या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. संघाने कमालीची कामगिरी केली आणि विशेषत: वैभव सुर्यवंशी याने कमालीचा खेळ दाखवला. आता भारताचा सामना हा 16 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना वेस्ट एंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कतार येथे खेळवला जाणार आहे. या सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे.
यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये वैभव सुर्यवंशी याने 144 धावांची खेळी खेळली होती. वैभवने या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात 42 चेंडूमध्ये 144 धावा केल्या होत्या यामध्ये 15 षटकार मारले होते. त्याचबरोबर या स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद हे जितेश शर्माकडे आहे. त्याने देखील यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले होते आणि दमदार खेळी खेळली.
स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर, भारत अ संघाचा सामना पहिल्या दिवशी, १४ नोव्हेंबर रोजी युएईशी सामना झाला. त्यानंतर, आम्ही १६ नोव्हेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना जाहीर केला आहे. भारताचा सामना १८ नोव्हेंबर रोजी ओमानशी होणार आहे. त्यानंतर, दोन्ही उपांत्य सामने २१ नोव्हेंबर रोजी होतील. दोन्ही विजेते संघ २३ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत खेळतील आणि एक नवीन विजेता स्थापन करतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना निश्चित असला तरी, जर दोन्ही संघ पुढे गेले तर आणखी सामने होण्याची शक्यता आहे. यासाठी सज्ज राहा.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा १६ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजन वर पाहणारे प्रेक्षक पाहू शकतात. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्ह अॅपवर पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 8 वाजता सुरु होणार आहे, तर या सामन्याचे नाणेफेक अर्ध्या तासाआधी होणार आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्ससाठी भारताचा संघ : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार) (यष्टीरक्षक), रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, विजय कुमार सिंग, युवराज कुमार, युवराज सिंह, विजय कुमार सिंह. अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुयश शर्मा.
स्टँडबाय खेळाडू: गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्रा, तनुष कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद.






