फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ईशान किशन संघामधून वगळले : इंग्लंड संघ आता भारत दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असली तरी वनडे मालिकेसाठी टीम अजून जाहीर झालेली नाही. भारताचा संघ T२० मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेमध्ये उपकर्णधार पद हार्दिक पांड्याकडून काढून घेण्यात आले आहे आणि अक्षर पटेल याला उपकर्णधार पद बनवण्यात आले आहे. यामध्ये अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला पुन्हा एकदा संघात संधी मिळाली नाही. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी ईशान बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता, मात्र त्याची प्रतीक्षा अधिक लांबत चालली आहे.
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान Bigg Boss 18 मध्ये युझवेंद्र चहल, वीकेंडच्या वॉरवर होणार रहस्य उघड
वास्तविक, टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. त्यानंतर इशान रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसला. या काळात त्याची कामगिरीही चांगली होती. इशानच्या चाहत्यांना आशा होती की, यावेळी त्याला इंग्लंडसोबतच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी मिळेल, पण आता चाहत्यांच्या आशांनाही पलटवार होताना दिसत आहे.
Ishan Kishan can be a good middle order batter for Champions Trophy. – Ball not moving will favour him in the middle overs.
– Can take the attack to spinners during the middle phase.
– Can score quick runs.
– Proved himself in ODIs.pic.twitter.com/kMIqSQKhbj — Inside out (@INSIDDE_OUT) January 10, 2025
विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या दोन्ही स्पर्धांमध्ये किशनची कामगिरी चांगली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ईशानला ६ सामन्यात १६१ धावा करता आल्या, तर लिस्ट ए स्पर्धेत त्याने ७ सामन्यात ३१६ धावा केल्या. आता निवडकर्त्यांनी संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांची इंग्लंडसोबतच्या टी-२० मालिकेसाठी निवड केली आहे.
ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. यानंतर ईशानने बीसीसीआयकडे विश्रांती मागितली होती, नंतर बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते पण ईशानने त्याकडे दुर्लक्ष केले होते. यानंतर ईशानचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही संपला. आता ईशानला टीम इंडियात परतण्याची संधी कधी मिळणार हे पाहणे बाकी आहे.
भारताचा संघ २२ जानेवारीला पहिला T२० मालिकेचा सामना इंग्लडविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. भारताच्या संघाने T२० क्रिकेटमध्ये आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पहिल्या सामन्याचे आयोजन ईडन गार्डन्स मैदानावर करण्यात आले आहे.