फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 विकेंडचा वॉर : बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले आता फक्त १ आठवडा दूर आहे. सध्या शोमध्ये ८ स्पर्धक शिल्लक आहेत, त्यापैकी एक शोची ट्रॉफी उचलणार आहे. घरामध्ये सदस्य करणवीर, शिल्पा शिरोडकर, विवियन डिसेना, चुम दारंग, अविनाश मिश्रा, रजत दलाल, चाहत पांडे आणि इशा सिंह हे सध्या घरामध्ये आहेत. यामध्ये आज रविवारच्या विकेंडच्या वॉरमध्ये एक सदस्याला बाहेर काढले जाणार आहे. सोशल मीडियावरील खबरी पेजनुसार चाहत पांडेला घराबाहेर काढण्यात आले आहे. अजूनही घरामध्ये सात सदस्य घरामध्ये आहेत यामध्ये कोणत्या सदस्याला फायनलमध्ये स्थान मिळणार हे सांगणं कठीण आहे.
कालच्या भागामध्ये सलमान खानने विकेंडच्या वॉरमध्ये करणवीर मेहरा आणि चुम दारंग या दोघांची शाळा घेतली. दरम्यान, सीझनच्या शेवटच्या विकेंडच्या वॉरमध्ये भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू देखील शोचा होस्ट सलमान खानसोबत मस्ती करताना दिसणार आहेत. सध्या धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत असलेला युजवेंद्र चहलही स्टेजवर दिसणार आहे. यादरम्यान सर्वात मोठे रहस्यही उघड होणार आहे. युझवेन्द्र चहल आणि धनश्री वर्माचे संपूर्ण प्रकरण काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
बिग बॉस १८ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोचा फिनाले १९ जानेवारी रोजी होईल, जिथे टॉप ७ स्पर्धकांपैकी एक शोचा विजेता होईल. त्याआधी, शोच्या शेवटच्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानने करणवीर, विवियन आणि चुमला खडसावले. यादरम्यान सलमानने तिघांनाही स्वत:साठी खेळण्यास सांगितले. सलमानने करणवीरला विचारले की जर तो चुमसाठी तिकीट टू फिनाले टास्क खेळत असेल तर तो स्वत: शोची ट्रॉफी कशी जिंकेल. सलमानने चुमला तिकीट टू फिनाले टास्कमध्ये परफॉर्म करण्याबद्दल काही प्रश्नही विचारले. यावेळी करणवीर मेहराने स्वतःसाठी सलमान खानला सडेतोड उत्तर दिले आहे.
Bigg Boss 18 च्या मेकर्सवर संतापली माजी विजेती, म्हणाला- ‘तुम्ही एका मर्यादेपर्यंतच फसवू शकता’
दरम्यान, आगामी भागामध्ये पंजाब किंग्जचे खेळाडू युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग शोमध्ये आले. तिघांनीही पहिल्यांदा सलमान खानसोबत स्टेजवर खूप धमाल केली. शशांक सिंगने सलमानला सांगितले की तो त्याच्यासाठी एक आदर्श आहे आणि तो त्याचे सर्व चित्रपट पाहतो. यानंतर, तिन्ही खेळाडू बिग बॉस १८ च्या स्पर्धकांना भेटतील आणि क्रियाकलाप क्षेत्रात त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतील. शोच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या प्रोमोमध्ये तिन्ही क्रिकेटर्सची मस्ती स्पष्टपणे दिसत आहे.
Jo players field par apna top-notch gameplay dikhate hain, woh gharwalon ke liye ek naya task lekar aaye hain.🏏🥳 Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10:30 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret… pic.twitter.com/kezPIKemoa — Bigg Boss (@BiggBoss) January 12, 2025
यादरम्यान सर्वात मोठे रहस्यही उघड होणार आहे. वीकेंड का वार वर कळेल की यावेळी आयपीएल २०२५ मध्ये कोणता खेळाडू पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असेल. याचा उलगडा आजवर झालेला नाही, त्यामुळे हे गुपितही सलमानसमोर उलगडणार आहे.