भारत विरुद्ध अफगणिस्तान सिरिज
दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या सिरिजपूर्वी झालेल्या नेट सेशनमध्ये जसप्रीत बुमराह अत्यंत लयबद्ध आणि प्रभावी गोलंदाजी करताना दिसला. बुमराहने नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केल्याचे समोर आले आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज उद्यापासून सुरू होणार आहे. आगामी ‘एशियन गेम्स २०२६’ च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. जसप्रीत बुमराहने नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केल्याचे समोर आले आहे. नेट सेशनदरम्यान बुमराहने 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करत याची परीक्षा घेतली. सराव सत्रात बुमराहच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी चाचपडताना दिसून आला. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Jasprit Bumrah vs Vaibhav Sooryavanshi. What happened next? pic.twitter.com/Ep6igaQUnf — Tanuj Lakhina (@tanujlakhina) September 11, 2026
दीर्घ काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहिल्यानंतर बुमराहने आता पूर्ण ताकदीने संघात पुनरागमन केले आहे. मात्र, आगामी मोठ्या स्पर्धा आणि कठीण दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण मालिकेत त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीवर आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर संघ व्यवस्थापनाचे बारीक लक्ष असणार आहे. दिल्लीतील नेट सेशनमध्ये त्याने अत्यंत वेगाने आणि लयबद्ध गोलंदाजी करत स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली असली, तर प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्याची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
सराव सत्रादरम्यान जसप्रीत बुमराहने सुरुवातीला अत्यंत अचूक गुड लेंथ चेंडू टाकले. बुमराहच्या या स्विंग आणि वेगाचा अंदाज न आल्यामुळे वैभव सूर्यवंशीला ते सुरुवातीचे चेंडू चाचपडत सोडावे लागले. यानंतर बुमराहने आपली तीक्ष्ण आणि वेगवान यॉर्कर फेकली. हा चेंडू इतका घातक होता की वैभवने अत्यंत घाईघाईत आपली बॅट खाली आणून तो अडवला आणि स्वतःचा बचाव केला. पुढील एका चेंडूवर बुमराहच्या वेगामुळे सूर्यवंशीच्या बॅटची बाहेरची किनार देखील लागली.






