ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज टी-२० विश्वचषकातील पहिल्या समण्याला मुकणार(फोटो-सोशल मीडिया)
Josh Hazlewood is out of the first match of the T20 World Cup : ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. पॅट कमिन्सला दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. आता, संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडल देखील टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तो संघासोबत श्रीलंकेला जाणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
राष्ट्रीय निवडकर्ता टोनी डोडमेड यांनी सोमवारी जाहीर केले की, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी संघासोबत श्रीलंकेला जाणार नाही. हेझलवूड सध्या त्याची पुनर्प्राप्ती प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. डोडमेडच्या मते, नॅथन एलिस, टिम डेव्हिड आणि ग्लेन मॅक्सवेल कोलंबोमध्ये दाखल जाहले आहेत आणि मंगळवारी ऑस्ट्रेलियन संघात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया ११ फेब्रुवारीपासून कोलंबो आणि पलेकेले येथे आयर्लंडविरुद्ध त्यांचे सुरुवातीचे चार गट सामने खेळणार आहे. गट टप्प्यातील त्यांचे इतर प्रतिस्पर्धी ओमान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
जोश हेझलवुड ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान सिडनीमध्येच राहणार आहे. जेणेकरून त्याला परिचित वातावरणात खेळण्यासाठी परतण्याचा कार्यक्रम सुरू ठेवण्यास मदत होईल. त्याच्या अनुपस्थितीत, अनुभवी वेगवान गोलंदाज शॉन अॅबॉटचा संघात प्रवासी राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे.
डोडमेड पुढे म्हणाले की, “नाथन, टिम आणि ग्लेन कोलंबोला आले असून पाकिस्तान दौऱ्यानंतर आमच्यासोबत सामील होणार आहेत. श्रीलंकेला जाण्यापूर्वी जोशने घरीच त्याची प्रकृती सुधारणे अधिक व्यावहारिक ठरेल असे आम्हाला वाटले.”
एक गोष्ट लक्ष्यात घेण्यासारखी आहे, की हॅझलवुडला यापूर्वी हॅमस्ट्रिंग स्ट्रेनमधून बरे होताना अॅकिलीसच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. ज्यामुळे तो २०२५-२६ अॅशेस मालिकेतून देखील बाहेर पडला होता. निवड समितीने अद्याप याबाबत स्पष्ट केलेले नाही की हेझलवुड स्पर्धेच्या कोणत्या टप्प्यावर उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी
कर्णधार पॅट कमिन्सला सततच्या पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याने ऑस्ट्रेलियाला आधीच मोठा झटका बसला आहे. त्याच्या जागी बेन द्वारशुइसचा १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. डोडमीड म्हणाले की, शॉन अॅबॉटची नॅथन एलिसचा बॅकअप म्हणून निवड करण्यात आली आहे.






