फोटो सौजन्य - RCB
Josh Hazlewood Injury Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धामुळे आणि वाढलेला तणावामुळे आयपीएलचे सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने म्हणजेच भारतीय नियमक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग उर्वरित सामने लवकरात लवकर खेळवले जातील असे सांगितले आहे. या संदर्भात अजूनपर्यंत नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही परंतु या महिन्यातच हे सामने होतील असे सूत्रांच्या माहितीने सांगितलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. मागील बरेच वर्ष बंगळुरूच्या संघाला त्यांच्या गोलंदाजीमुळे बऱ्याचदा टीका करण्यात आली आहे.
पण या सीझनमध्ये त्यांनी मेगा ऑक्शनमध्ये भुवनेश्वर कुमार, जोस हझलवूड, कृणाल पांड्या त्याचबरोबर यश दयाल अनुभवी आणि दमदार गोलंदाजांचा समावेश केला आहे. आयपीएलचे १२ सामने अजूनपर्यंत शिल्लक आहेत यामध्ये क्वालिफायरचे तीन सामने आणि एक फायनल सामना म्हणजेच एकूण सोळा सामने अजूनपर्यंत खेळवण्याचे शिल्लक राहिले आहेत.
🚨 NO HAZELWOOD FOR RCB 🚨
– Josh Hazelwood is a doubt to return for the remainder of IPL 2025 if it resumes this month due to a shoulder niggle. (ESPNcricinfo). pic.twitter.com/uzqpJtkhNW
— Tanuj (@ImTanujSingh) May 11, 2025
रॉयल चॅलेंजेस बंगळुरूच्या संघाला क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक विजयाची गरज आहे. पण त्याआधी संघाला आता मोठा धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीने असेच सांगण्यात येत आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. यासंदर्भात अजून पर्यंत बंगळुरूच्या संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आयपीएल सगळेच होण्याआधी जोश हेझलवूडने एक सामना दुखापतेमुळे मिस केला होता. आत्ता सूत्रांच्या माहितीने असे म्हटले जात आहे की तो पुढील उर्वरित कोणताही सामना खेळणार नाही पण अजूनपर्यंत या बातमीत किती टक्के आहे हे फ्रॅन्चायझींनी सांगितल्यावरच कळेल.
डिसेंबर-जानेवारीमध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तो पायाच्या दुखापतीमुळे आणि बाजूच्या ताणामुळे खेळला नव्हता. याशिवाय, तो फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही उपस्थित नव्हता. तथापि, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, दुखापत असूनही, क्रिकेट ऑस्ट्रेलिया लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप फायनलपूर्वी जोश हेझलवूडला कंडिशनिंग कॅम्पमध्ये घेऊन जाईल. हे शिबिर जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. हेझलवूड व्यतिरिक्त, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेड यांनीही आयपीएलमध्ये परतण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. हे सर्वजण ऑस्ट्रेलियाच्या जागतिक क्रीडा परिषदेच्या राष्ट्रीय कर्तव्यावर असतील.