महान आर्यमन सिंधिया(फोटो-सोशल मीडिया)
Mahanaryaman Scindia is the youngest president of MPCA:केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मुलाने एक नवीन विक्रम स्थापन केला आहे. महान आर्यमन सिंधिया हे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. महान आर्यमन सिंधिया हे ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर महान आर्यमन सिंधिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महानार्यमन सिंधिया यांचे वय केवळ २९ वर्ष आहे. महान आर्यमन सिंधिया हे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होणारे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. १९५७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एमपीसीएच्या इतिहासातील आर्यमन हे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. ग्वाल्हेरच्या माजी राजघराण्याचे तिसऱ्या पिढीचे वंशज असणारे महानार्यमन सिंधिया लवकरच एमपीसीएचे सूत्रे स्वीकारणार आहेत.
हेही वाचा : ‘दोघांच्या जवळपासही कुणी नाही..’ ‘RO-KO’ च्या निवृत्तीवर फिरकीपटू रवी बिश्नोईची नाजुक साद
महाआर्यमान सिंधिया यांची बिनविरोध निवड
एमपीसीएचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रोहित पंडित यांनी सोमवारी पीटीआयला माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “एमपीसीए निवडणुकीत अध्यक्षांसह कार्यकारिणीची सर्व पदे देखील बिनविरोध निवडणून आली आहेत. अशा प्रकारे संपूर्ण कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे.” ते पुढे म्हणाले की, “एमपीसीएची नवनिर्वाचित कार्यकारिणी २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यकारी अधिकारी आपापला पदभार स्वीकारणार आहेत.”
पंडित यांनी पुढे सांगितले की, “एमपीसीएच्या नव्या कार्यकारिणीमध्ये विनीत सेठिया यांची उपाध्यक्षपदी, सुधीर असनानी यांची सचिवपदी, अरुंधती किरकिरे यांची संयुक्त सचिवपदी आणि संजीव दुआ यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.” त्यांनी असे देखील सांगितले की, “एमपीसीएच्या व्यवस्थापकीय समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये संध्या अग्रवाल, राजीव रिसोडकर, प्रसुन कानमाडीकर आणि विजेश राणा यांचा देखील समावेश आहे, तर प्रदीप बॅनर्जी, रमणिक पटेल आणि अभय लघाटे यांना क्रिकेट समितीत स्थान दिले गेले आहे.”
मागील तीन वर्षांमध्ये मध्य प्रदेश क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये महान आर्यमन यांची सक्रियता दिसून येत आहे. महान आर्यमन यांची २०२२ मध्ये जीडीसीएचे उपाध्यक्ष म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना २०२२ मध्येच एमपीसीएचे आजीवन सदस्यही बनवण्यात आले होते. महान आर्यमन हे राज्याच्या टी२० क्रिकेट लीग मध्य प्रदेश लीगचे अध्यक्षही आहेत.
हेही वाचा : CPL 2025 मध्ये Tim Seifert चे वादळ घोंघावले! झळकवले सर्वात जलद शतक; केला ‘हा’ पराक्रम