TVS Orbiter आणि Bajaj Chetak 3001 मध्ये बेस्ट कोण? (फोटो सौजन्य: X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. यातही सर्वात जास्त मागणी ही इलेक्ट्रिक दुचाक्यांना मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये चांगल्या रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे. नुकतेच TVS या आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीने मार्केटमध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS Orbiter लाँच केली आहे. ही स्कूटर Bajaj Chetak 3001 सोबत स्पर्धा करणार आहे.
टीव्हीएस ऑर्बिटर आणि बजाज चेतक 3001 या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त ई-स्कूटर आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वात बेस्ट स्कूटर कोणती? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Renault ची ‘ही’ अफलातून कार फक्त 2 लाखात आणा घरी! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
टीव्हीएस ऑर्बिटर आणि बजाज चेतक 3001 हे दोन्ही स्कूटर्स आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह येतात, पण वैशिष्ट्यांमध्ये काही ठळक फरक आहेत. टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये 5-इंच कलरफुल एलसीडी कन्सोल मिळतो, तर चेतक 3001 मध्ये गोल रंगीत एलसीडी आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ब्लूटूथ-सक्षम स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन उपलब्ध आहे. रायडिंग मोड्समध्ये ऑर्बिटर इको आणि सिटी मोड्स देते, तर चेतक इको आणि स्पोर्ट्स मोड्ससह येतो.
दोन्ही स्कूटर्समध्ये रिव्हर्स मोड आणि हिल होल्ड असिस्ट आहेत, परंतु चेतकसाठी हे TecPac पॅकेजसोबत दिले जातात. सेफ्टी फीचर्समध्ये ऑर्बिटर जिओफेन्सिंग, टाइम-फेन्स, क्रॅश/फॉल अलर्ट आणि अँटी-थेफ्ट अलर्टसह अधिक प्रगत आहे, तर चेतक 3001 मध्ये जिओफेन्सिंग आणि इमोबिलायझरची सोय आहे. TecPac फिचरमुळे चेतक कॉल स्वीकारणे/नकार देणे आणि म्युझिक कंट्रोल करता येते, जे ऑर्बिटरमध्ये नाही. दुसरीकडे, ऑर्बिटरमध्ये क्रूझ कंट्रोलची सुविधा आहे, जी चेतकमध्ये नाही. दोन्ही मॉडेल्स यूएसबी चार्जिंग पोर्टसह येतात, त्यामुळे स्मार्टफोन चार्जिंगची सोय सोपी होते.
भारतात TVS NTorq 150 लाँच होण्याच्या तयारीवर, दमदार इंजिनसह मिळणार अफलातून फीचर्स
TVS Orbiter ची एक्स-शोरूम किंमत 99,999 आहे, तर Bajaj Chetak 3001 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 99,990 आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमती जवळपास सारख्याच आहेत, मात्र फीचर्समध्ये मोठा फरक जाणवतो. TVS Orbiter हा better value for money ठरतो कारण त्याचे सर्व फीचर्स कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळतात. तर दुसरीकडे, Chetak 3001 हा त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे जे साधी आणि सोयीस्कर ई-स्कूटर शोधत आहेत आणि ज्यांना जास्त फीचर्सची विशेष गरज नाही.