कल्याणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मनोज जरांगे पाटील यांना थेट संदेश दिला आहे. त्यांनी आंदोलन चांगल्या पद्धतीने उभारल्याचे कौतुक करताना, “खालच्या पातळीवरील टीका टाळावी” असे आवाहन केले. मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी सांगितले की, आरक्षणाच्या मागणीसाठी उभारलेले आंदोलन हे मराठा समाजाच्या हिताचे असून त्याला समाजाचा मोठा प्रतिसाद आहे. मात्र यावेळी सभ्य भाषा आणि सकारात्मक भूमिका घेतली तर आंदोलनाला अधिक ताकद मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला.