बेंगलोरमध्ये चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण या आनंदाला गालबोट लागलें आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच, हा उत्साह चाहत्यांसाठी जिवावर बेतला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन १० लोकांचे जीव गेला आहे. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अचानक गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र अचानक वाढलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ११ चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. तरी २५ पेक्षा जास्त लोकही अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व घटनेवर बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले, ” रॉयल चॅलेंजर्सच्या संघाच्या विजयी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. ५ हजारांपेक्षा जास्त पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते. मी पोलिसांना दोष देणार नाही. घडलेल्या दुर्घटनेबद्दल मी सर्वांची माफी मागतो.”
हे कसले सेलिब्रेशन?
आज आरसीबीचा संघ आपल्या होमपीचमध्ये दाखल झाला. तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीचे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी सोशल आयोजित करण्यात आला होता. मात्र ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर येण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी झाली होती.
स्टेडियमवर इतक्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती कि पोलिसांना स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले. मात्र या मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त नागरिक अस्वस्थ असल्याचे समजते आहे. मात्र बाहेर हे सगळे सुरु असताना देखील स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सेलिब्रेशन सुरुच होते. त्यामुळे खेकसले सेलिब्रेशन आहे? असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका आता होत आहे. की बाहेर चेंगराचेंगरी होऊन अनेक जणांचा जीव गेला आहे हि बातमी आत पोहोचली नव्हती अशी चर्चा सुरु झाली आहे.
काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. विजयानंतर संघ बुधवारी दुपारी बेंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर आला तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांनी आरसीबी संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांची देखील रस्ता मोकळा करताना दमछाक झाली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघ विमानतळावर पोहचताच राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.