फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Rain on the Eden Gardens : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान आता पावसाने हजेरी लावली आहे. सामना सुरू असताना पहिले फलंदाजी झाल्यानंतर ईडन गार्डनच्या मैदानावर जोरदार हवा सुरू झाली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पाऊस पडायला लागला. त्यामुळे सामना रोखण्यात आला होता. आत्तापर्यंत सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पंजाबने पहिले फलंदाजी करत चार विकेट्स गमावून २०२ धावा केला होत्या. आज कोलकाता नाईट राइडर्ससमोर २०३ धावांचे लक्ष्य आहे. पण आज सामन्याच्या वेळेत जर पाऊस सुरूच राहिला तर काही होणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा. आजच्या सामन्यात प्रभासिमरन सिंग आणि प्रियांस आले यांनी धुवाधार फलंदाजी केली आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांना त्यांच्याच होम ग्राउंड वर चांगलेच धुतलं.
Play interrupted due to bad weather. 🌧
Stay tuned for further updates.
Updates ▶ https://t.co/oVAArAaDRX #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/xqVXThmniJ
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
हवामान सामान्य झाल्यानंतर केकेआरचा डाव पुन्हा सुरू होईल. त्यावेळी पंच सामन्याचा वेळ किती कमी करायचा हे ठरवतील आणि टार्गेटमध्ये काही बदल होतो का हे देखील पहावे लागेल. हवामानाची ही स्थिती पाहून, ग्राउंड स्टाफ कव्हर घेऊन मैदानाकडे धावला आणि सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले. सामना थांबवला तेव्हा केकेआरने एका षटकात न गमावता सात धावा केल्या होत्या. त्यांचे दोन्ही सलामीवीर सुनील नारायण आणि रहमानउल्लाह गुरबाज मैदानावर खेळत होते. सुनील नरेनने ३ चेंडूत ४ धावा काढल्या तर गुरबाजने ३ चेंडूत एक धाव काढली. पंजाबकडून मार्को जॅनसेनने पहिले षटक टाकले.
प्रभसिमरन सिंग (८३) आणि प्रियांश आर्य (६९) यांच्या अर्धशतकांमुळे आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७२ चेंडूत १२० धावांची भागीदारी केल्याने पंजाब किंग्जने केकेआरविरुद्ध ४ बाद २०१ धावा केल्या. प्रभसिमरनने ४९ चेंडूंच्या खेळीत सहा षटकार आणि तितकेच चौकार मारले, तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिले शतक झळकावणाऱ्या प्रियांशने ३५ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि चार षटकार मारले. १४ व्या षटकानंतर पंजाबला एका बाद १५८ अशी मोठी धावसंख्या उभारायची होती पण केकेआरच्या गोलंदाजांनी शेवटच्या सहा षटकांत फक्त ४३ धावांत तीन बळी घेत त्यांना २०१ धावांवर रोखले.