फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Punjab Kings 1st innings report : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबच्या संघाने सुरुवात दमदार केली आणि दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतक झळकवले. आज पहिल्या १२ ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांना भरपूर धुतलं. आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट राइडर्ससमोर 202 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने उभे केले आहे.
कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाला मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या पहिल्या डावात खेळाडूंची कशी कामगिरी राहिली आहे यावर एकदा नजर टाका. आजच्या सामन्यातील पंजाब किंग्सच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर प्रियांश आर्याने आज कमालीची खेळी खेळली. प्रियांश आर्य याने आज संघासाठी ३५ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४ षटकार आणि ८ चौकार मारले. प्रभासिमरन सिंह याने आज सुरुवात संथ केली होती त्यानंतर त्याने संघासाठी धुव्वादार खेळी खेळली. यामध्ये त्याने ४९ चेंडूंमध्ये ८३ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ षटकार आणि ६ चौकार मारले आहेत.
Innings Break
Strong comeback by the #KKR bowlers 👏
Are we in for another thriller? 🤔
Scorecard ▶ https://t.co/oVAArAaDRX #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/my3RtluYkp
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
श्रेयस अय्यर आज मोठी खेळी खेळी खेळू शकला नाही. त्याने आज संघासाठी १६ चेंडूमध्ये २५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणखी एकदा फेल ठरला. त्याने आज त्यानं ८ चेंडू खेळले आणि वरुण चक्रवर्तीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यानन्स फलंदाजीला आला होता पण तो विशेष कामगीरी करू शकला नाही.
कोलकाता नाईट राइडर्सने आज फक्त ४ विकेट्स घेतले यामध्ये, वैभव अरोडा याने संघासाठी २ विकेट्स घेतले तर आंद्रे रसेलने संघासाठी १ विकेटची कमाई केली. वरुण चक्रवर्ती याने संघासाठी १ विकेट घेतला. आजच्या सामन्यात सुनील नारायण आणि गुरबाज या दोघांच्या फलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे. कारण २०३ धावांचे लक्ष्य कोलकाता नाईटला पार करणे सोपे नसणार आहे. अजिंक्य रहाणे दमदार फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर रघुवंशी आज कोणत्या स्थानावर फलंदाजीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. पॉरेलला संघामध्ये स्थान मिळाले आहे त्यामुळे आज आंद्रे रसेल आणि पॉरेल कशी कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.