या सामन्यातील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे विराट कोहलीचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक. किंग कोहलीने तब्बल 3 वर्षांनंतर (1020 दिवस) शतक केले आहे. त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या केएल राहुलने 62 धावा केल्या.
प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या. इब्राहिम झद्रानने 62 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 5 बळी घेतले. अफगाणिस्तानचा संघही विराट कोहलीच्या धावसंख्येपेक्षा 11 धावांनी मागे पडला.