फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders : आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. केकेआरने डीसीला त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभूत केले. या विजयासह कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरची सुरुवात चांगली झाली आणि वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली खेळी केली. आजच्या सामन्यात सुनील नारायण याने संघासाठी ३ विकेट्स घेतले. त्याचबरोबर वरुण चक्रवर्तीने सुद्धा संघासाठी कमालीची गोलंदाजी केली. त्याने संघासाठी २ विकेट्स घेतले.
मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावांवर रोखले, हे वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने तीन विकेट्स घेतल्याच्या शानदार गोलंदाजीमुळे झाले. अंगकृष रघुवंशीने ३२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. रिंकू सिंगने २५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३६ धावा केल्या. सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजने फक्त १२ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या.
Match 48. Kolkata Knight Riders Won by 14 Run(s) https://t.co/saNudbWaXT #DCvKKR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
सुनील नारायणने १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने १४ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह २६ धावा जोडल्या. आंद्रे रसेलने ९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १७ धावा केल्या. दिल्लीकडून स्टार्कने शानदार गोलंदाजी केली, ३ विकेट्स घेतल्या आणि कोलकात्याला २०४ धावांवर रोखले.
पहलगाम हल्ल्यावर शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला फटकारले, म्हणाला – किती खालच्या पातळीवर जाणार…
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर आजच्या सामन्यात अभिषेक पोरेल फेल ठरला. त्यांना आज फक्त दोन चेंडू खेळलाय आणि दुसऱ्या इनिंगच्या दुसऱ्या चेंडूवर त्याचा विकेट अनुकूल रॉय यांनी घेतला. करून नायर या सामन्यातही आपल्याशी ठरला, आजचा सामना त्याने १३ चेंडूमध्ये १५ धावा केल्या. के एल राहुल याला सुनील नारायण यांनी धावबाद करून पवेलियनचा रस्ता दाखवला. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल यांनी चांगली खेळ खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. अक्षर पटेल ने २३ चेंडूमध्ये ४३ धावा केल्या. ट्रिस्टन स्टॅब्स तो मोठ्या शॉर्ट साठी ओळखला जातो त्याचीही बॅट आज सुनील नारायण समोर चाललेली नाही.
केकेआरच्या गोलंदाजीची सांगायचे झाले तर सुनील नारायण याने संघासाठी ३ विकेट्स घेतले. तर वरून चक्रवर्ती याने संघासाठी २ विकेट्स घेतलं. अनुकूल रॉय, आंद्रे रसेल आणि वैभव अरोडा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.