Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा; कोण आहे हा नवा ‘किंग’?

स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांनी १५,६६० कोटी रुपयांना Rajasthan Royals फ्रँचायझी खरेदी केली आहे. या व्यवहारात अदार पूनावाला यांचीही मोठी हिस्सेदारी असून राजस्थान रॉयल्सच्या एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 04:02 PM
Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा (Photo Credit- X)

Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • Rajasthan Royals विकली गेली रे..!
  • तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा
  • कोण आहे हा नवा ‘किंग’?
Rajasthan Royals Sale 2026: आयपीएलच्या (IPL) मैदानावर सध्या खेळासोबतच कॉर्पोरेट जगतातही मोठी खळबळ उडाली आहे. जगातील दिग्गज उद्योगपती आणि ‘स्टील किंग’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल यांनी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रँचायझीचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. या व्यवहारामुळे क्रिकेट आणि व्यापार विश्वात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

१५,६६० कोटींचा मेगा व्यवहार

भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी जयपूरस्थित या संघाच्या खरेदीसाठी अंतिम करार पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. हा संपूर्ण व्यवहार सुमारे १.६५ अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार १५,६६० कोटी रुपयांना झाला आहे. या नवीन मालकी हक्काच्या कन्सोर्टियममध्ये मित्तल यांच्यासोबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला आणि विद्यमान मालक मनोज बदाले यांचाही समावेश आहे.

🚨 BREAKING Lakshmi Mittal has announced the acquisition of Rajasthan Royals franchise. Adar Poonawalla and Manoj Badale are part of the consortium that has acquired the franchise for $1.65 billion. pic.twitter.com/MiZ5piwzrP — Cricbuzz (@cricbuzz) May 3, 2026

मालकी हक्काचे नवे समीकरण

‘क्रिकबझ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या करारानंतर मित्तल कुटुंबाकडे राजस्थान रॉयल्सची सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के हिस्सेदारी असेल. अदार पूनावाला यांच्याकडे १८ टक्के वाटा असेल, तर उर्वरित ७ टक्के हिस्सा जुन्या गुंतवणूकदारांकडे राहील. विशेष म्हणजे, मनोज बदाले हे संघाचे मार्गदर्शक म्हणून आपली जबाबदारी कायम ठेवणार आहेत.

KKR vs SRH: प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकाता मैदानात; हैदराबादने नाणेफेक जिंकून निवडली फलंदाजी! पाहा प्लेइंग 11

ग्लोबल नेटवर्कवर ताबा

या अधिग्रहणांतर्गत केवळ आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच नाही, तर दक्षिण आफ्रिकेतील ‘पार्ल रॉयल्स’ आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग मधील ‘बारबाडोस रॉयल्स’ या संघांचाही समावेश आहे. बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या अधिकृत मंजुरीनंतर २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राजस्थानाशी भावनिक नाते

लक्ष्मी मित्तल यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपूर गावात झाला असल्याने ही डील त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. “माझे कुटुंब राजस्थानचे आहे, त्यामुळे आयपीएलमध्ये या संघाचा भाग होण्यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही,” अशा भावना मित्तल यांनी व्यक्त केल्या आहेत. शालेय जीवनापासून क्रिकेटचे चाहते असलेल्या मित्तल यांनी राजस्थान रॉयल्सच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चाहत्यांसोबत मैदानात उतरण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

नव्या युगाची सुरुवात

२००८ मध्ये आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्स हा संघ सध्या २०२६ च्या हंगामातही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. वैभव सूर्यवंशी यांसारख्या तरुण खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे संघ फॉर्मात असतानाच, मित्तल यांच्यासारख्या बड्या नेतृत्वाचा पाठिंबा मिळाल्याने राजस्थान रॉयल्सच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. मजबूत आर्थिक पाठबळामुळे आगामी काळात हा संघ यशाची नवनवी शिखरे सर करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चला पॅकअप करा! साधं जिंकताही आलं नाही; CSK ने MI ला चारली धूळ, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं

Web Title: Lakshmi mittal acquires rajasthan royals for 15660 crore ipl news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.