यंदा फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) अर्जेंटिनाचा (Argentina) संघ विश्वविजेता ठरला. अर्जेंटिनाचा संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) ने आपल्या जादुई कामगिरीने फिफा विश्वचषकावर नावं कोरलं. आधीच त्यानं सगळ्या जगावर भुरळ पाडलेली आहेच. आता पुन्हा मेस्सीची जादु चालल्याचं दिसतय. नुकत्याच पार पडलेल्या फिफा फुटबॉल पुरस्कार (FIFA Football Awards 2022) सोहळ्यात लिओनेल मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. (Best FIFA Men’s Player Lionel Messi ) तर, स्पेनची ॲलेक्सिया पुटेलस (Alexia Putellas) सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली आहे.
[read_also content=”तोंडाच्या कर्करोगाची ‘ही’ आहेत सुरुवातीची लक्षणंं, दुर्लक्ष करू नका नाहीतर पडणार महागात! https://www.navarashtra.com/health/health/these-are-the-early-symptoms-of-mouth-cancer-dont-ignore-it-or-it-will-be-expensive-nrps-372896.html”]
लिओनेल मेस्सीने फ्रान्सच्या (France) किलियन एमबाप्पेला (Kylian Mbappe) मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये कतारमध्ये पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकलं. त्याच्या या कामगिरीने तो पाप्युलर खेळाडु म्हणुन गणला जाऊ लागलाय. त्यात नुकत्याच फिफा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि या पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सीला सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
स्पेन संघाची ॲलेक्सिया पुटेलस (Alexia Putellas) सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ॲलेक्सिया सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली आहे.
सर्वोत्तम फिफा पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना/पॅरिस सेंट-जर्मेन एफसी)
सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू : अॅलेक्सिया पुटेलास (स्पेन/एफसी बार्सिलोना फेमेनी)
सर्वोत्तम फिफा महिला गोलकीपर : मेरी इर्प्स (इंग्लंड/मँचेस्टर युनायटेड डब्ल्यूएफसी)
सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर : एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना/अॅस्टन व्हिला एफसी)
सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक : सरिना विगमन (इंग्लंड महिला राष्ट्रीय संघ)
सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षक : लिओनेल स्कालोनी (अर्जेंटिना पुरुष राष्ट्रीय संघ)
फिफा पुस्कास पुरस्कार : मार्सिन ओलेक्सी (पोलंड/वॉर्टा पॉझ्नान)
फिफा फेअर प्ले अवॉर्ड : लुका लोचोशविली (जॉर्जिया/वोल्फ्सबर्गर एसी/यू.एस. क्रेमोनीज)
फिफा फॅन अवॉर्ड : अर्जेंटिनियन चाहते