अर्जेंटिना संघाचा कर्णधार असलेला जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे चाहते जगभरात आहेत. मेस्सीने नुकतेच आपल्या अर्जेंटिना संघाला फिफा विश्वचषक जिंकून देत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. यामुळे सध्या मेस्सीच्या फॅन्समध्येही आनंदाचे वातावरण आहे. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे हा खेळाडू पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. तेव्हा या जगप्रसिद्ध खेळाडूबद्दल सध्या सोशल मीडिया तसेच सर्च इंजिन्सवर लोक अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास इच्छुक आहेत. अशातच आम्ही लिओनेल मेस्सी वापरत असलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या फोन विषयी काही इंटरेस्टिंग माहिती घेऊन आलो आहोत.
रिपोर्टनुसार लियोनेल मेसी iPhone Xs Max हा फोन वापरतो. हा फोन त्याने कस्टमाइज केला आहे. फोन घेतल्यावर त्याने त्यात बदल केला आहे. या फोनसाठी तो कस्टमाइज गोल्ड केस वापतो.या गोल्ड केसच डिझाइन iDesign Gold ने तयार केली आहे. जेव्हा घेतला त्यावेळी हा फोन सगळ्यात महागडा होता. त्यावर गोल्ड कोटींग लावल्याने त्याची व्हॅल्यू अजूनच वाढली. ही केस २४ कॅरेट गोल्ड पासून बनवण्यात आली आहे.
iDesign Gold ने ही केस डिझाइन केली. फोनच्या पाठीमागे त्याचं नाव आणि जर्सी नंबर आहे. याशिवाय त्याच्या पत्नीचं आणि मुलाचंपण नाव यावर टाकलेलं आहे. याबरोबरच डिव्हाइच्या मागे बार्सिलोना आणि अर्जेंटीनाचे बॅजपण बघयाला मिळतात. या फोनच्या किंमतीचा अंदाज लावायचा झाला तर iPhone Xs Max ची गेल्ड केस सहित किंमत साधारणपणे तब्ब्ल २१ हजार डॉलर्स किंवा १७ लाख रुपये इतकी आहे. आता कदाचित त्याच्या कडे लेटेस्ट iPhone 14 Pro Max असू शकतो. पण याविषयी कोणताही नवीन रिपोर्ट अद्याप आलेला नाही.