
photo- yandex
Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत
लो बीपीच्या रुग्णांनी शरीराला ऊर्जा देणारे आणि रक्तनिर्मितीस मदत करणारे पदार्थ खाणे आवश्यक मानले जाते. अंडी, दूध, दही, बदाम, केळी, डाळिंब, बीट, हिरव्या पालेभाज्या आणि अंकुरित धान्य यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो. या पदार्थांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असते. दिवसातून तीन मोठ्या जेवणांऐवजी ४ ते ५ वेळा थोडे-थोडे खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मीठाचे किंवा सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. सोडियम रक्तदाब वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर नारळपाणी, ताक, लिंबूपाणी आणि ORS सारखे पेय शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. तसेच, दिवसाला शरीराला आवश्यक पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
लो ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी झोपेतून किंवा खुर्चीतून अचानक उठणे टाळावे. अचानक हालचाल केल्यास चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आधी काही सेकंद बसून मग हळूहळू उभे राहणे अधिक सुरक्षित मानले जाते. नियमित हलका व्यायामही रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो.
लो ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी जास्त तेलकट, तळलेले आणि अतिगोड पदार्थ टाळणे आवश्यक आहे. मद्यपान आणि सतत उपाशी राहणेही धोकादायक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये जास्त कॅफीनयुक्त पेय किंवा अनियमित आहारामुळेही रक्तदाब अस्थिर होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यावर भर देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.