संजीव गोएनका आणि ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs PBKS : आयपीएल २०२५ चा ५४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर लखनौला २३६ धावांचे भले मोठे लक्ष्य दिले होते. प्रभसिमरन सिंगने आपल्या ९१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी केली. प्रत्युउत्तरात एलएसजीचा संघ केवळ १९९ धावाचा करू शकला. एलएसजीकडून आयुष बडोनी (४० चेंडू ७४धावा) आणि अब्दुल समद (२४ चेंडूत ४५धावा) यांची झुंज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. तर संघाचा कर्णधार ऋषभ पंत या सामन्यात देखील फ्लॉप ठरला. त्याने फक्त १७ चेंडूत १८ धावा केल्या.
पंजाबने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना लखनौ संघाच्या सलामीवीर फलंदाजांनी खूप निराशाजनक कामगिरी केली. मिचेल मार्श, एडेन मार्करन आणि निलोकस पूरन सारखे फलंदाज या वेळी फार काही खास करू शकले नाही. त्याच वेळी, कर्णधार ऋषभ पंतची बॅट देखील नेहमीप्रमाणे या सामन्यातही शांत दिसून आली. आयपीएल २०२५ मध्ये ऋषभ पंतची फलंदाजी खूपच निराशाजनक राहिली आहे. पंजाबविरुद्ध पंत १७ चेंडूत फक्त १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी एलएसजीच्या कर्णधारावर चांगलाच राग व्यक्त केला.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत या वर्षीच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला २७ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात समाविष्ट केले. असे असून देखील, आयपीएल २०२५ हा पंतसाठी सर्वात वाईट हंगाम ठरत आहे. त्याने या हंगामात एकूण ११ सामने खेळले असून यामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त १२८ धावाच आल्या आहेत. अशा परिस्थितीत चाहते सोशल मीडियावर पंतला खूप ट्रोल करताना दिसून येत आहे.
हेही वाचा : RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी, फोटो व्हायरल..
तसेच लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर एडेन मार्कराम आणि मिशेल मार्श हे देखील पंजाबविरुद्ध सुपर फ्लॉप ठरले. एडेन मार्करम १३ धावांवर तर मिचेल मार्श शून्य धावांवर बाद झाला. यानंतर लगेचच निकोलस पूरन देखील ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने तिन्ही फलंदाजांना माघारी पाठवले. याशिवाय डेव्हिड मिलरही अवघ्या ११ धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेला.