ग्लेन मॅक्सवेल(फोटो-सोशल मीडिया)
MLC 2025 : अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग 2025 चा थरार सुरू आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. या स्पर्धेत एक अजब कारनामा बघायला मिळाला आहे. ग्लेन मॅक्सवेलची टीम वॉशिंग्टन फ्रीडम आणि फाफ डू प्लेसिसची टीम क्वालिफायर 1 मध्ये आमनेसामने येणार होती. परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. परिणामी मॅक्सवेलची टीमने एकही सामना न खेळता मेजर क्रिकेट लीग 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
तर दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसची टीम टेक्सास सुपर किंग्जला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी आणखी एक संधी बाकी आहे. लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना दुसरा क्वालिफायर सामना काहीही करुन जिंकावा लागणार आहे. त्याच वेळी, वॉशिंग्टन फ्रीडम न खेळता अंतिम फेरी कशी गाठली? आता असा प्रश्न पडू लागला आहे. लोक त्याबद्दल विचारणा करू लागले आहेत. आता आम्ही तुमहला या मागील कारण संगणार आहोत.
हेही वाचा : IND W vs ENG W : भारताविरुद्धच्या ३ एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड महिला संघ जाहीर; जखमी ब्रंटचे संघात परतली
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मेजर क्रिकेट लीग २०२५ च्या क्वालिफायर-१ मध्ये बुधवार, ९ मे रोजी वॉशिंग्टन फ्रीडम आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळवला जाणार होता. या सामन्यासाठी टॉस झाला आणि त्यानंतर सामना सुरू होण्याची वाट पहावी लागली, मात्र पावसाने एक देखील संधी दिली नाही आणि सामन्यात एकही चेंडू टाकण्यात आला नाही. ज्यामुळे क्वालिफायर-१ चा हा सामना रद्द करण्यात आला.
ग्लेन मॅक्सवेलच्या वॉशिंग्टन फ्रीडम संघाला पावसाचा चांगला फायदा झाला. यामागील कारण म्हणजे वॉशिंग्टन फ्रीडम लीगमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे, डू प्लेसिसचा संघ टेक्सास सुपर किंग्ज संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. क्वालिफायर १ रद्द होताच वॉशिंग्टन फ्रीडम थेट अंतिम फेरीत पोहोचला.
वॉशिंग्टन फ्रीडम संघाने मेजर क्रिकेट लीग स्पर्धेत शानदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत संघाने एकूण १० सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी ८ सामने आपल्या नावावर केले आहेत. तर २ सामन्यात पराभव पत्करला आहे. सध्या वॉशिंग्टन फ्रीडमच्या खात्यावर एकूण १६ गुण जमा आहेत.
जर फाफ डू प्लेसिसचा संघ टेक्सास सुपर किंग्जबद्दल सांगायचे झाले तर ते सध्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्यांनी लीगमध्ये एकूण १० सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी ७ सामने जिंकले आहेत. तर उर्वरित ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. टेक्सास सुपर किंग्जचे सध्या एकूण १४ गुण आहेत.