भारत आणि इंग्लंड टी-२० मालिका(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs ENG W : भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात आज चौथा टी-२० सामना खेळला जाणार आहे. आज बुधवारी रात्री ११ वाजता सामन्याला सुरवात होणार आहे. जर भारताला इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकायची असेल, तर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा यांना चौथ्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे, परंतु गेल्या आठवड्यात ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाच धावांनी विजय मिळवून पाहुण्या संघाच्या काही चुका देखील उघड केल्या आहेत.
या सामन्यात शेफालीने २५ चेंडूत ४७धावा आणि हरमनप्रीतने १७चेंडूत २३ धावा केल्या, परंतु दोन्ही फलंदाज त्यांच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकले नाहीत. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनजोत कौर यांनी आतापयत भारताकडून फलंदाजीची जबाबदारी घेतली आहे आणि त्यांना या दोन अनुभवी खेळाडूंकडून अधिक सहकार्याची अपेक्षा असेल. ८ महिन्यांनंतर संघात परतल्यानंतर शेफालीला मोठी खेळी करता आली नसल्याने ती आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक असणार आहे. तिने पहिल्या दोन सामन्यांमध्ये २० आणि तीन धावा केल्या. हरमनप्रीत पहिल्या सामन्यात खेळू शकली नाही. दुसऱ्या सामन्यात ती परतली ज्यामध्ये तिला फक्त एक धाव करता आली. पहिल्या सामन्यात खूप प्रभावी कामगिरी करणाऱ्या हरलीन देओलच्या जागी तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.
हेही वाचा : IND W vs ENG W : भारताविरुद्धच्या ३ एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड महिला संघ जाहीर; जखमी ब्रंटचे संघात परतली
भारताचे फिरकीपटू एन श्री चरणी (८ बळी), दीप्ती शर्मा (०६) आणि वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी (४) यांनी या मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांना डावखुरा फिरकीपटू राधा यादव आणि वेगवान गोलंदाज अमनजोत यांच्याकडून थोडी अधिक साथ मिळण्याची आवश्यकता असेल. इंग्लंडचा विचार केला तर, जर त्यांना मालिका बरोबरीत आणायची असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. गेल्या सामन्यात, सलामीवीर सोफिया डंकले आणि डॅनी व्याट-हॉज यांनी अर्धशतके झळकावली आणि संघाला त्यांच्याकडून पुन्हा अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
भारतः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, कांती गौड, सायली सतघरे.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘एजबॅस्टन कसोटी विजय गोड..’, टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया चर्चेत
इंग्लंडः टॅमी ब्यूमोंट (कर्णधार), एम अलॉट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, एमी जोन्स (यष्टिरक्षक), पेज स्कॉलफिल्ड, लिन्से स्मिथ, डॅनी व्याट-हॉज, इस्सी वोंग, माया बाउचियर. वेळ :: सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू होईल.