मयंक यादव : आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध मुंबई इंडियन (Mumbai Indians) यांच्यामधील आयपीएल 2024 चा (IPL 2024) 48 वा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचा संघ 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्सचा संघ या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे 6 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. सामान्यांच्या आधी लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) आयपीएल 2024 मध्ये आपल्या वेगवान गतीने खूप मथळे निर्माण केले. पण या स्पर्धेत तो दोन सामने खेळला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला दुखापत झाली.
मयंक दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यांमधून बाहेर आहे. पण आता लखनऊने मयंकच्या पुनरागमनाबाबत मोठा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत मयंक मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करणार का? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. लखनऊच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये मयंक यादवची झलक दिसत आहे. लखनौच्या या व्हिडिओवरून अंदाज लावला जाऊ शकतो की आज मुंबईत खेळल्या जाणाऱ्या सामन्यात मयंक पुनरागमन करू शकतो.
याआधी मयंकने फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्याची बातमी आली होती. आयपीएल 2024 चा 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मोसमात लखनौ आणि मुंबई यांच्यातील ही पहिलीच लढत असेल. आयपीएल 2024 मध्ये, मयंकने पंजाब किंग्जविरुद्ध पहिला सामना खेळला, ज्यामध्ये त्याने केवळ 27 धावा देत 3 विकेट घेतल्या. चमकदार कामगिरीसाठी मयंकला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दुसरा सामना खेळला. बेंगळुरूविरुद्धही मयंकची उत्कृष्ट कामगिरी कायम राहिली आणि त्याने केवळ 14 धावा दिल्या होत्या. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही मयंक सामनावीर ठरला होता.