आयपीएल 2026 नंतर कोणाचे कर्णधारपद जाणार? (फोटो- ai gemini)
आयपीएल संपताच अनेक खेळाडूंचे कर्णधारपद जाण्याचा अंदाज
केकेआर, लखनौ आणि दिल्लीच्या कर्णधारांचे पद जाण्याची शक्यता
यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी न केल्याने पद धोक्यात
IPL 2026: आयपीएलचा महासंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. 26 मे पासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप प्ले ऑफमध्ये कोणते 4 संघ जाणार ते निश्चित झालेले नाही. एका बाजूला टॉप 4 साठी चुरस सुरू आहे. मात्र काही संघ अद्याप लढाई करताना दिसून येत आहे. तर काही संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेले आहेत. त्यामुळे आयपीएल संपताच काही संघांच्या कर्णधारांचे पद जाण्याची शक्यता आहे.
यंदाच्या आयपीएलच्या हंगामातून मुंबई इंडियन्स आणि लखनौचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या धक्क्यानंतर दोन्ही व्यवस्थापन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे म्हटले जात आहे. लखनौचा संघ यंदाच्या लीगमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही.
ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ खेळत होता. मात्र त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील वर्षी एखादा नवा खेळाडू लखनौची कमान सांभाळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने देखील साधारण कामगिरी केली आहे. हे दोन संघ अद्याप प्ले ऑफमध्ये जाणार की नाही याची खात्री वाटत नाहीये. अद्याप हे दोन्ही संघ बाहेर पडले नसले तरी देखील प्ले ऑफ मध्ये जवळपास अशक्य झाले आहे.
LSG Vs RCB Live: आरसीबीने वाढवल्या लखनौच्या अडचणी; टॉस जिंकत घेतला थेट ‘हा’ निर्णय
आगामी हंगामात केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन मोठे फेरबदल करू शकते. अजिंक्य राहणे आणि अक्षर पटेल यांचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. तसेच कोचिंग स्टाफ आणि अन्य खेळाडू यांच्याबाबत देखील महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चालू हंगामात इतर संघांचे व्यवस्थापन देखील आपल्या कर्णधारांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे मुंबई इंडियन्सला देखील यंदा चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबई मॅनेजमेंट हार्दिक पंड्याचे कर्णधारपद काढून घेणार का हे पहावे लागणार आहे.
धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार? रिझर्व्ह डे की..; ‘हा’ नियम उडवेल तुमची झोप
धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार?
26 मे पासून क्वालिफायर आणि एलिमेनेटर व फायनल सामने होणार आहेत. या चार सामन्यांमध्ये पाऊस झाला तर कोणते नियम लागू होतात. आयपीएलच्या केवळ फायनल सामन्यासाठीच रिझर्व्ह डे ठेवण्यात येतो. क्वालिफायर 1 , एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामन्यांसाठी कोणताही दिवस राखीव नसतो. मात्र यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो.






