Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs PBKS : नेस वाडियाकडून पंजाबच्या विजयाचे जबरा सेलिब्रेशन! श्रेयस अय्यरचे घेतले चुंबन अन्.., पहा Video

क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत आपला आनंद साजरा केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 09:27 PM
MI vs PBKS: Ness Wadia celebrates Punjab's victory! Kisses Shreyas Iyer and.., watch video

MI vs PBKS: Ness Wadia celebrates Punjab's victory! Kisses Shreyas Iyer and.., watch video

Follow Us
Close
Follow Us:

MI vs PBKS : आयपीएल २०२५ च्या काल पार पडलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले. या विजयानंतर संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत आपला आनंद साजरा केला आहे. या दरम्यान, वाडिया यावेळी श्रेयस अय्यरचे अभिनंदन करताना त्याचे चुंबन देखील घेताना दिसून आले.

वाडियांनी घेतले कश्रेयसचे चुंबन..

क्वालिफायर-२ मध्ये पंजाब संघाने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये आपल्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी खेळाडूंसोबत देखील केक कापला आणि तो कर्णधार श्रेयस अय्यरला खायला दिला. तेव्हा त्यांनी अय्यरचे चुंबन देखील घेतले.  तसेच विजयाबद्दल अभिनंदन केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : MI vs PBKS : Suryakumar Yadav ची गाडी काही थांबेना! IPL मध्ये रचला इतिहास, Sachin Tendulkar ला टाकले पिछाडीवर; वाचा सविस्तर..

Ness Wadia kissing Shreyas Iyer during the celebration. ❤️pic.twitter.com/5mG7n4m1c6 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2025

पंजाबचा संघ ११ वर्षांनी अंतिम फेरीत

पंजाब किंग्जने मुंबई विरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ मध्ये संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, परंतु कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला पराभूत करून तत्यांचे स्वप्न मोडले.  परंतु यावेळी संघ चांगल्या  लयीत आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी जेतेपद जिंकणारा श्रेयस अय्यर पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी तयार झाला आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : अंतिम सामन्यात आरसीबीच्या स्वप्नावर पावसाची टांगती तलवार! पंजाबसाठी फायद्याच्या सरी; वाचा सविस्तर..

 अय्यरची वादळी खेळी..

क्वालिफायर २ सामन्यात अहमदाबादमध्ये पाऊसन सुरू झाल्यामुळे सामना लेट खेळवण्यात आला. या सामन्यात  श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली खेळी करून मुंबईच्या हातचा विजय खेचून आणला. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याचे उत्तर मुंबई इंडियन्सच्या कुणाच्याच  गोलंदाजांकडे सापडत नव्हते. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून २०३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १९ व्या षटकात टार्गेट पूर्ण केले. यामध्ये  कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८७ धावांची नाबाद खेळी करून संघाला अंतिम सामन्यात पोहचवले.

Web Title: Mi vs pbks ness wadia celebrates punjabs victory kisses shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs PBKS
  • Rajat Patidar
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
1

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
2

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.