टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI ranking : आयसीसीने नुकतीच ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या वेळी आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारीत मोठी चूक झाली होती. त्यानंतर आता जाहीर झालेल्या नव्या क्रमवारीत सुधारणा करण्यात आली असून भारतातील दोन खेळाडू टॉप ५ मध्ये आहेत.
एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज शुभमन गिल आणि रोहित शर्मा पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर विराट कोहली चौथ्या स्थानावर विराजमान आहे. तसेच बाबर आझम या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शुभमन गिल (७८४ रेटिंग गुण) आणि रोहित शर्मा (७५६) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत, तर पाकिस्तानचा बाबर आझम (७३९) तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीचे ७३६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय खेळाडूंनी जवळपास ६ महिन्यांपासून एक देखील एकदिवसीय सामना खेळलेला नाही. रोहित आणि कोहली दोघांनीही शेवटचा एकदिवसीय सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्याखेळला होता. रोहित आणि कोहली या दोघांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून दोघेही एकदिवसीय स्वरूपात खेळत आहेत. फलंदाजांव्यतिरिक्त, गोलंदाजांच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये कुलदीप यादव ६५० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर रवींद्र जडेजा ६१६ गुणांसह नवव्या स्थानी विराजमान आहे.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम
या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ज्यामध्ये सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीच्या जोरावर खेळाडूंच्या क्रमवारीत चांगलीच वाढ झाली. ट्रॅव्हिस हेड एका स्थानाने सुधारणा करून ११ व्या स्थानी पोहचला आहे. मिचेल मार्शलाचार स्थानांचा फायदा होऊन तो ४४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर कॅमेरॉन ग्रीन ४० स्थानांनी झेप घेऊन ७८ व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर जोश इंग्लिसला २३ स्थानांनी झेप घेऊन ६४ व्या स्थानावर गेला आहे.
गोलंदाजीत श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश थिकेशना ६७१ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आला आहे. दरक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजांचे रँकिंग घसरले आणि त्यांचे रेटिंग थिकेशना बरोबरीचे झालेअ आहे, तर श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज संपूर्ण आठवडा मैदानावर खेळला नव्हता. लुंगी एनन्गिडीने मोठी झेप घेऊन २८ वे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा : यशस्वी जयस्वालच्या रडारवर ‘हा’ मोठा विक्रम! Duleep Trophy मध्ये ‘ही’ कामगिरी करताच रचणार इतिहास