माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन घेणार तेलंगण राज्याच्या मंत्रीपदाची शपथ(फोटो-सोशल मीडिया)
सध्या, तेलंगणा काँग्रेस सरकारमध्ये एक देखील मुस्लिम मंत्री नाही. यामुळे मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व सरकारकडे नसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. अझरुद्दीनच्या समावेशामुळे ही पोकळी भरून निघणार असल्याचे बोलले जात आहे. अझरुद्दीनच्या समावेशामुळे, रेवंत रेड्डी मंत्रिमंडळात आता एकूण १६ मंत्री होणार आहेत. जे राज्यातील कमाल १८ आहेत.
ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात अंदाजे ३.९० लाख मतदार संख्या आहे. त्यापैकी १.२० ते १.४० लाख संख्या ही मुस्लिम समुदायची आहे. याचा अर्थ प्रत्येक तिसरा मतदार मुस्लिम समुदायाचा आहे. म्हणूनच मुस्लिम मतांचा निकालावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणारा आहे. अझरुद्दीनला मंत्री म्हणून नियुक्त करून काँग्रेसकडून मुस्लिम समुदायावरील आपला विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये मुरादाबाद येथून काँग्रेस खासदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१४ मध्ये त्यांनी राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नंतर २०१८ मध्ये त्यांना तेलंगणा काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते.






