फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल? याचा काही नेम नाही. सुरुवातीला प्रत्येक जण स्वतःसाठी खेळतो, मग त्यांच्यामध्ये गट्टी जमते आणि त्यांच्यात टीम तयार होतात. स्वतःसाठी खेळणारे हे स्पर्धक मग एकमेकांसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार करून भावनिक खेळ खेळू लागतात आणि मध्येच भावना तुटल्या तर बहुतेक जणांचा खेळ खराब होऊन जातो. असेच काही आता बिग बॉसच्या घरात चित्र दिसू लागले आहे. रुचिताने विशालवर रागाचे बाण सोडले आहेत.
कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसून येत आहे की रुचिता आणि विशाल, त्यांच्या वाड्यावर बसले आहेत. त्यांच्यामध्ये नॉमिनेशनच्या टास्कवरून चर्चा सुरु आहे. विशालने तन्वीला सेफ केल्यामुळे रुचिता त्याच्यावर फार भडकली आहे. दरम्यान, त्याला सांगितले की “तू जर तिथे जाणार असशील तर मला आधीच सांग!” त्यामुळे आता टोळी तुटणार की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
रुचिता का भडकली?
सध्या बिग बॉसमध्ये नॉमिनेशनचा टास्क सुरु आहे. दोन जणांमधून एकाला योग्य ते कारण सांगून नॉमिनेट करायचे आहे, ते करण्यासाठी दोन जणांना नियुक्त केले जाईल. सममताने समोर उभे असणाऱ्या दोघांमधील एकाला नॉमिनेट करावे लागेल. दरम्यान, राकेश आणि तन्वीला विशाल आणि अनुश्रीमधील एकाला नॉमिनेट करायचे होते. राकेश आणि तन्वीने सममताने विशालला नॉमिनेट केले पण त्यावेळी विशालला त्या दोघांनी शब्दांचा मारा करत “तू शेर नाहीस एक भोका आहेस” असे शब्द वापरले.
ते असूनही विशालने तन्वी आणि करणमध्ये तन्वीला सेफ केले. तिला नॉमिनेट केले नाही, त्यामुळे रुचिता जी आधीच तन्वीसोबत भांडून बसली आहे, तिने विशालवर रागाचा मारा केला. पण हा विशालचा काही गेमप्लॅन आहे का? की खरंच तन्वी या आठवड्यात दिसून आली आहे त्यामुळे त्याने घेतलेला फेअर निर्णय? हे येत्या काळात कळून येईल. पण विशालच्या या वागण्याने, आता टोळी तुटणार की काय? असा प्रश्न उदभवला आहे.






