ईशानऐवजी वैभवला संधी मिळण्याची शक्यता (फोटो सौजन्य - Instagram)
दुसऱ्या सामन्यात ईशानऐवजी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. मात्र तो केवळ ४ धावा करून परतला होता. पण आता पुन्हा एकदा वैभवला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या या सामन्यात वैभव पुन्हा खेळू शकतो आणि यावेळी त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा टी२० सामना मंगळवार अर्थात २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी वेलिंग्टनमध्ये खेळला जाणार आहे. BCCI नुसार, ईशान किशनच्या उजव्या पायावर दुखापत झाली असून मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत.
BCCI ने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान उजव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या किरकोळ दुखापतीतून ईशान किशन चांगला बरा होत आहे. तथापि, तो अद्याप खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वेलिंग्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून तो बाहेर असेल. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.
ईशानच्या दुखापतीबाबत दिलासादायक बाब ही आहे की, त्याची प्रकृती सुधारण्याची प्रक्रिया योग्य दिशेने पुढे जात आहे. तथापि, तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत त्याला मैदानात उतरवण्याचा धोका पत्करण्याची संघ व्यवस्थापनाची इच्छा नाही. त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
BCCI ने स्पष्ट केले आहे की, यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्र तिसऱ्या सामन्यासाठी संघात कायम राहील. दुसऱ्या सामन्यापूर्वी ईशानच्या जागी बदली खेळाडू म्हणून कुमारचा संघात समावेश करण्यात आला होता. आता ईशानच्या अनुपस्थितीत तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ कोणती रणनीती अवलंबतो हे पाहणे बाकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ५ सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र.
Ans: २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी तिसरा टी२० सामना न्यूझीलंडविरूद्ध भारत खेळणार
Ans: BCCI ने सांगितल्यानुसार ईशान किशनच्या मांडीच्या मसल्सना दुखापत झाली आहे
Ans: ईशान किशनच्या जागी वैभवला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे






