टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जगभरात करोडो चाहते आहेत. क्रिकेटशिवाय धोनीला आलिशान कार आणि बाईक घेण्याचा शौक आहे. या बाईक आणि कारसोबत धोनी अनेकदा दिसला आहे.
महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो करोडोंची कमाई करतो. तो सध्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत असून संघाने त्याला करोडो रुपये देऊन कायम ठेवले होते.
महेंद्रसिंग धोनी हा लक्झरी लाइफ जगण्यासाठी जगभर ओळखला जातो. क्रिकेटशिवाय तो अनेक प्रसंगी आपले छंदही पूर्ण करताना दिसला आहे. धोनीकडे बाईक आणि कारचे मोठे कलेक्शन आहे.
धोनीकडे रेंज रोव्हर, ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, टोयोटा, हमर आणि महिंद्रा यांसारख्या अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे, ज्यांची किंमत लाखो रुपये आहे. काही गाड्यांची किंमत दोन कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
धोनीला बाइक्सचाही खूप शौक असून त्याच्याकडे एकापेक्षा एक बाईक आहेत. धोनीकडे बुलेट, हायाबुसा, कावासाकी निन्जा, यामाहा आर1, यामाहा थंडरकॅट आणि डुकाटी 1098 सारख्या लक्झरी बाइक आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे.
महेंद्रसिंग धोनी एका वर्षात किती कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंग धोनीची संपत्ती 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जाहिरात आणि क्रिकेटमधून तो दरवर्षी सुमारे 50 कोटी कमावतो.